शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपांवर गुंडाळले नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:11 IST

पेट्रोलपंपांवर ग्राहकांसाठी काही आवश्यक सुविधा असाव्यात, असा नियम आहे. पेट्रोलपंप संचालक हे नियम पाळतात की नाही, हे तपासण्याची जबाबदारी आॅईल कंपन्यांसह जिल्हा प्रशासनाची आहे.

ठळक मुद्देग्राहक हक्कांना बाधा : प्रसाधनगृह, पेयजल, वाहनांमध्ये हवा भरण्याची सोेयही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पेट्रोलपंपांवर ग्राहकांसाठी काही आवश्यक सुविधा असाव्यात, असा नियम आहे. पेट्रोलपंप संचालक हे नियम पाळतात की नाही, हे तपासण्याची जबाबदारी आॅईल कंपन्यांसह जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र, महानगरातील अपवाद वगळता कोणत्याही पेट्रोेलपंपांवर या सुविधा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. यामुळे पेट्रोलपंपांवर एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उद्भवतो.पेट्रोलपंपांवर पिण्याचे पाणी, ग्राहक तक्रार पुस्तिका, कालबाह्य फायर ईस्टिगेशन, प्रथमोपचार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, महिला-पुरूषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असावे, असा नियम आहे. मात्र, बहुतांश पेट्रोलपंपांवर या सुविधांचा पत्ता नाही. मात्र, याकडे आॅईल कंपन्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. इतकेच नव्हे तर भेसळयुक्त इंधन तपासणीलादेखील बहुतांश पेट्रेलपंपांनी ‘ब्रेक’ दिल्याने पंपसंचालकांची मुजोरी कोण रोखणार, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे.पेट्रोलपंपांवर ग्राहकांसाठी उपलब्ध आवश्यक सुविधा तपासण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. तसेच संबंधित आॅईल कंपन्यांच्या विभागीय वितरकांनी वारंवार पेट्रोलपंपान्ाां भेटी देऊन पेट्रोल, डिझेलची तपासणी करणे अनिवार्य आहे. तेथे ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यास तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून सदर पेट्रोलपंपांचा परवाना निलंबित करण्याचा नियम आहे.परंतु महानगरात तीन ते चार पेट्रोलपंप वगळता इतर ठिकाणी ग्राहकांसाठी फारशा सुविधा उपलब्ध नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीदरम्यान दिसून आले. अनेक पेट्रोलपंपांवर तर कालबाह्य अग्निशमन यंत्र ठेवण्यात आले आहेत. ‘सँड बकेट’मध्ये आग विझविण्यासाठी वाळू भरून ठेवली जाते. मात्र, बहुतांश पेट्रोलपंपांवर या वाळुची माती झाली असून या मातीमिश्रीत वाळुने आग विझविणार कशी, हा देखील गंभीर प्रश्न आहे.पेट्रोलपंपांच्या दर्शनी भागात ग्राहकांसाठी तक्रारपुस्तिका असावी, असे नियम म्हणतो. पंरतु पेट्रोलपंप संचालक ही तक्रारपुस्तिका स्वत:च्या कस्टडीत ठेवतात. बहुतांश पेट्रोलपंपांवरील पाणी शुद्धिकरण यंत्र केवळ शोभेची वस्तू ठरले आहे. अलिकडे तर पाणी शुद्धिकरण यंत्राऐवजी परिसरातील घाणीतच घाणयुक्त पेयजलासाठी माठ भरून ठेवला जातो. पेट्रोल व डिझेलचे दर हे पेट्रोेलपंपाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावणे अनिवार्य आहे. मात्र, अपवादात्मक स्थितीत हे दरफलक आढळून येतात. प्रत्येक पंपावर वाहनांमध्ये हवा भरण्याची सुविधा अनिवार्य असतानाही मोजक्याच पेट्रोलपंपावर हवा भरण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. एरवी पेट्रोलपंपावर आस्कमिक प्रसंग उद्भवल्यास ग्राहकांना संपर्क साधता यावा,तक्रार पुस्तिका ग्राहकांसाठी नाहीअमरावती : यासाठी दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देणे, हे पंपमालकांचे कर्तव्य आहे. मात्र, एकाही पेट्रोलपंपावर ग्राहकांसाठी दूरध्वनीसेवा उपलब्ध नाही. स्थानिक रूक्मिणीनगरातील ‘राठोड ब्रदर्स’या पेट्रोेलपंपावर तक्रारपेटी लावल्याचे दिसून आले. इतर ठिकाणी तक्रारपेटी उपलब्ध नव्हती. कित्येक पेट्रोलपंपांवर प्रथमोपचार पेटी असल्याचे केवळ फलक दिसून आला. अनेक ठिकाणी प्रसाधनगृह असले तरी ते कुलूपबंद करून ठेवले जाते. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा लाभ कधीच घेता येत नाही. शहरात सर्वच प्रमुख आॅईल कंपन्यांचे पेट्रोलपंप सुरू आहेत. त्याकरिता आॅईल कंपन्यांनी विभागीय प्रबंधक, इंधन तपासणी अधिकारी नियुक्त केले आहेत. मात्र, आॅईल कंपन्यांच्या अधिकाºयांचे पेट्रोलपंप संचालकांसोबत लागेबांधे असल्याने पेट्रोलपंप ग्राहकांसाठी की मालकांसाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वसामान्यांना पेट्रोलपंपावर असुविधा असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

महसूल विभाग अनभिज्ञपेट्रोलपंपांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी पर्यायाने महसूल विभागाची आहे. मात्र, मागील सहा महिन्यांत शहरातील एकाही पेट्रोलपंपावर महसूल विभागाने धाडसत्र राबवून पेट्रोलची तपासणी केली नाही. तसेच आॅईल कंपन्यांचाही ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ कारभार सुरु असल्याने ग्राहक हक्कांना बाधा पोहोचत आहे. जिल्ह्यात १३६ पेट्रोलपंपांची नोंद महसूलकडे असून ग्रामीण भागात ११८ तर शहरात १८ पंप असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी परदेशी यांनी दिली.पंपांवर या असाव्यात सुविधावाहनात हवा भरण्याची नि:शुल्क व्यवस्था, प्रथमोचार पेटी, तक्रारपुस्तिका, इंधन दराचे माहिती फलक, पेट्रोल, डिझेलच्या तपासणीसाठी पाच लीटरचे माप, अग्निशमन यंत्र, आपातकालिन परिस्थितीत ग्राहकासाठी दूरध्वनीची सोय, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, शुद्ध पाण्याची व्यवस्था, डिलरचे नाव, दूरध्वनी क्रमांक, आॅईल कंपनीचे नाव असणे अनिवार्य आहेआॅईल कंपन्यांचे संपर्क क्रमांक गायबशहरात प्रामुख्याने चार ते पाच आॅईल कंपन्याचे पेट्रोलपंप सुरु आहेत. यात ९० टक्के पेट्रोलपंपांवर आॅईल कंपन्याचे विभागीय प्रबंधक, वितरणप्रमुखांचे दूरध्वनी क्रमांकांचे फलक पेट्रोलपंपावर ठळकपणे लावण्यात आले नाही. तथापि बºयाच वाहनचालकांना पेट्रोलपंपांवर ग्राहकांसाठी असणाºया सुविधांची जाणीवच नसल्याने ही बाब पंपमालकांसाठी लाभदायक ठरत आहे. त्यामुळे पेट्रोलपंपांवर सुविधा नसल्या तरी कुणी काहीच करु शकत नाही, या अविर्भावात पेट्रोलपंपमालक वावरत आहेत.पेट्रोलपंपांची तपासणी तहसीलदारांकडे सोपविली आहे. महिनाभरात किती पेट्रोलपंपाची तपासणी झाली, याचा आढावा घेतला जाईल. ग्राहकांसाठी सुविधा नसणाºया पेट्रोलपंपमालकांना नोटीस बजावल्या जातील.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी, अमरावती.पेट्रोलच्या दरांमध्ये सतत तफावत आढळते. पेट्रोलचे प्रतिलिटर दर नेमके किती, हे कळत नाही. पंपावर ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. तक्रार पुस्तिका मागितली तर कशासाठी, असा प्रतिप्रश्न केला जातोे.- उज्ज्वल वानखडेग्राहक, बिच्छुटेकडी अमरावती.