शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कोळी महासंघाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:31 IST

आदिवासी कोळी महासंघाने विविध मागण्यांसाठी २२ आॅक्टोंबर रोजी माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या नेतृत्वात इर्विनचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यत आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, समाजावर विदर्भ, मराठवाड्यात आरक्षणाबाबत होत असलेला अन्याय थांबविण्यात यावा व इतर मागण्याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधत विभागीय आयुक्त पियुषसिंह यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमोर्चा : मागण्यांकडे वेधले शासन, प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी कोळी महासंघाने विविध मागण्यांसाठी २२ आॅक्टोंबर रोजी माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या नेतृत्वात इर्विनचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यत आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, समाजावर विदर्भ, मराठवाड्यात आरक्षणाबाबत होत असलेला अन्याय थांबविण्यात यावा व इतर मागण्याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधत विभागीय आयुक्त पियुषसिंह यांना निवेदन देण्यात आले.आदिवासी विभागाने पुणे विद्यापीठाच्या मानववंश शास्त्रज्ञ अंजली कुरणे यांना राज्यातील आदिवासी कोळी जमातीचा अभ्यास करण्याचे व अहवाल शासनास सादर करण्याची दिलेली जबाबदारी थांबवाव, राज्यातील त्या त्या भागातील विद्यापिठामधील तज्ञांकडे ही जबाबदारी सोपवावी, स्वातंत्र्योत्तर काळाच्या ७० वर्षात विदर्भ मराठवाडयातील महादेव कोळी, टोकरे व मल्हार कोळी याबाबत कोणतेही संशोधन नाही. म्हणून तपासणी समितीने दिलेले निकाल रद्द करून सरसकट जोपर्यत संशोधन होत नाही तोपर्यत लाभार्थ्याना सेवेतून कमी करू नये, त्यांना सेवेत कायम करावे, कोळी महादेव जमातीच्या लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र करीताचे प्रस्ताव एसडीओचे निर्देश असल्यामुळे किंवा शासनाचे निर्देशामुळे आम्ही स्विकारत नाही ,असे उत्तर सेतू चालक देतात , त्यांची चौकशी करून परवाना निलंबित करावा व एसडीओवर कारवाई करावी, तपासणी समित्यांची पुनर्रचना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे करावी, जात प्रमाणपत्र तपासणी समितीचा विषय हा राज्याच्या विधी व न्याय विभागाअंतर्गत असावा व त्या करीता जात न्यायालयांची स्थापना करून जिल्हा न्यायाधिश दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजीमंत्री दशरथ भांडे, एकनाथ जुवार,कर्नल गाले, मनोहर बुध, बद्रीनाथ भोपसे, भास्कर कोलटेके, सुरेश खेडकर,गजानन चुनकीकर, उमेश घुरडे,रवी भांडे,, मोहन जामनेकर, मयुरी कावरे यांची उपस्थिती होती.युवा स्वाभिमानचाही सहभागघटनादत्त अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या महादेव कोळी यांना सोयी सवलती मिळाव्या यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत,या महादेव कोळी समाजाच्या मागणीला युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आ.रवी राणा,मार्गदशीका नवनित राणा यांनी पांठीबा दिला होता.दरम्यान विभागीय आयुक्तांना निवेदन देतांना नवनित राणा,उमेश ढोणे, प्रमोद खर्चान, लता रायबोले, संतोष कोलटेके, मिरा कोलटेके, वंदना जामनेकर, सोपान मोहोकार,राहूल कासमपुरे, अवधूत दंदे, गोपाल बुंदे आदी उपस्थित होते.