अमरावती : इर्विन रुग्णालयाने गोवर रुबेला लसीकरणाचे ९० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. पाल्यांच्या भविष्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे असल्याने पालकांनी लसीकरणाबाबत कोणताही संभ्रम न ठेवता पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा सामान्य रुग्णालयाला १ लाख १३ हजार ५७ उद्धिष्ट आहे. त्यापैकी १ लाख २०७ जणांना लस देण्यात आली असून, हे प्रमाण ८८.६३ टक्के आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ३ लाख ९२ हजार ७१७ चे उद्दिष्ट आहे. त्यापैकी त्यांनी ३ लाख ४५ हजार १० लसीकरण केले आहेत. त्याचे प्रमाण ८७.८५ टक्के आहे. याशिवाय महापालिकेला १ लाख ६१ हजार १०६ चे उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यापैकी त्यांनी अमरावती शहरात १ लाख २२ हजार ७४० जणांना लसीकरण केले आहे. हे प्रमाण ७६.१९ आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केले असतानाही काही विशिष्ट विचारसरणीच्या पालकांच्या विरोधामुळे काही मुले लसीकरणापासून अजूनही वंचित आहेत. ही बाब मुलांच्या भविष्यातील आरोग्यासाठी धोका निर्माण करणारी आहे. काही पालकांमधील गैरसमजामुळे त्यांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घेतलेले नाहीत. भविष्यात संक्रमणाच्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास ही लस उपयुक्त असल्याने ज्या मुलांचे लसीकरण झाले नाहीत, त्यांना भविष्यातील धोका टाळण्यासाठी ज्या पालकांनी आपल्या मुलांचे रुबेला व गोवरचे लसीकरण केले नाही, त्यांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.लसीकरणाने धोका टळतोएमआर लसीकरण मोहिमेत नऊ महिने पूर्ण आणि १५ वर्षांपेक्षा कमी अशा सर्व बालकांना ही लस दिल्याने गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून संरक्षण मिळते. गोवर व रुबेलाचे रुग्ण वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंतही दिसून येतात. त्यामुळे बालकांना लस दिल्याने आजारावर नियंत्रण मिळवता येते. गर्भवती मातांना वेळेत लसीकरण केल्याने रुबेलाची लागण होऊन बाळ गर्भात दगावण्याचा धोका कमी असतो. ही मोहीम झाल्यानंतर गोवर लसीऐवजी एमआर एक, एमआर दोन अशा पद्धतीने नेहमीच लसीकरण केले जात आहे.गोवर व रुबेला लसीकरणामुळे संक्रमणाचा धोका टळतो. ज्यांनी लसीकरण केले नाही, त्यांनी कोणताही गैरसमज न बाळगता, तत्काळ लसीकरण करून मुलांचे आरोग्य सुरक्षित करावे.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक
रुबेला, गोवर लसीकरणापासून वंचितांच्या आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:34 IST
इर्विन रुग्णालयाने गोवर रुबेला लसीकरणाचे ९० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. पाल्यांच्या भविष्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे असल्याने पालकांनी लसीकरणाबाबत कोणताही संभ्रम न ठेवता पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.
रुबेला, गोवर लसीकरणापासून वंचितांच्या आरोग्याला धोका
ठळक मुद्दे९० टक्के उद्दिष्ट पूर्ण : पालक ठरताहेत पाल्यांच्या भविष्यात खोडा