शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सच्या तपासणीसाठी आरटीओ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 23:51 IST

अमरावती शहराला वळण घेऊन जाणाऱ्या नागपूर रिंगरोडवरील प्रत्येक ट्रॅव्हल्सची कागदपत्रे, फिटनेस, अग्निशमन यंत्रणा, प्रवासी सुविधांची चाचपणी रात्रीही केली जाणार आहे. तसेच खासगी बस, ट्रॅव्हल्स संचालकांना वाहनांची फिटनेस तपासणी अनिवार्य राहील, यासाठी आरटीओ नोटीस बजावणार आहे. विनाफिटनेस वाहन रस्त्यावर आढळल्यास परवाना निलंबित केला जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाशिक येथे ट्रॅव्हल्स आणि टॅंकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या भीषण अपघातानंतर शासन, प्रशासन ‘इन ॲक्शन’वर आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवारी सकाळपासूनच ट्रॅव्हल्सची तपासणी युद्धस्तरावर चालविली आहे. दरम्यान, एका खासगी बसची तपासणी केली असता, फिटनेसप्रकरणी २२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारून ऑनलाइन चालान जारी करण्यात आले. आरटीओच्या फिरत्या पथकाने मोर्शी, नागपूर महामार्गावर दिवसभरात सुमारे १४ खासगी प्रवासी वाहनांची तपासणी केली. यात तीन खासगी वाहनांना दंड आकारला. एका वाहनचालकाकडे अपुरी कागदपत्रे होती तर एका वाहनाचा फिटनेस योग्य नसल्याबाबत दंड आकारण्यात आला आहे. तिन्ही वाहनांना ४८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्याबाबतचे ऑनलाइन चालान जारी करण्यात आले आहे. आता अमरावती येथून ये-जा करणारी खासगी वाहने, ट्रॅव्हल्स व वाहनांची तपासणी केली. शनिवारी एका राजकीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखाच्या ट्रॅव्हल्सला फिटनेसबाबत २२ हजार ५०० रुपयाचा दंड आकारला.

रिंगरोडवर रात्रीला तपासणीअमरावती शहराला वळण घेऊन जाणाऱ्या नागपूर रिंगरोडवरील प्रत्येक ट्रॅव्हल्सची कागदपत्रे, फिटनेस, अग्निशमन यंत्रणा, प्रवासी सुविधांची चाचपणी रात्रीही केली जाणार आहे. तसेच खासगी बस, ट्रॅव्हल्स संचालकांना वाहनांची फिटनेस तपासणी अनिवार्य राहील, यासाठी आरटीओ नोटीस बजावणार आहे. विनाफिटनेस वाहन रस्त्यावर आढळल्यास परवाना निलंबित केला जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते यांनी सांगितले.

नाशिक येथील अपघाताची घटना दुर्दैवी आहे. मात्र ट्रॅव्हल्स अथवा खासगी वाहनांची तपासणी निरंतर सुरुच राहील. अगोदर सुद्धा अपूर्ण कागदपत्रे अथवा नियम डावलून रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी पंधरा वाहनांची तपासणी करण्यात आली.- सिद्धार्थ ठोके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस