अकोला : शासनाच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणारा उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभाग दिलेल्या उद्दिष्टापासून माघारत आहे. २0१४-१५ या वित्तीय वर्षामध्ये विभागाने चार महिन्यांमध्ये केवळ ११ कोटी १९ लाख ६५ हजार ६३१ रुपयांचा महसूल गोळा केला. शासनाच्या तिजोरीमध्ये ४२ कोटी ६७ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट आरटीओला दिले होते. त्यानुसार आरटीओ विभागाने चार महिन्यांमध्ये १४ कोटी २२ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करणे अपेक्षित होते. परंतु आरटीओ विभागाने चार महिन्यांमध्ये ११ कोटी १९ लाख रुपयांचा महसूल गोळा केला. दिलेल्या उद्दिष्टानुसार यंदा आरटीओ विभाग महसूल वसुलीमध्ये माघारला आहे. तब्बल ३ कोटी २ लाख ६८ हजार ३६९ रुपयांचा महसूल गोळा करण्यात आरटीओ विभागाला यश आले नाही. ** विविध शुल्कापोटी ८ कोटींचा महसूल उपप्रादेशिक परिवहन विभागाने विविध शुल्क वसुलीच्या माध्यमातून ८ कोटी ४२ लाख ४४ हजार रुपयांचा महसूल गोळा केला. वाहन नोंदणी शुल्क, विलंब शुल्क, शोरूम निरीक्षणच्या माध्यमातून एकूण १ कोटी २२ लाख ५0 हजार १२५ रुपये, पर्यावरण शुल्काचे १३ लाख ७७ हजार ३७८ रुपये व दुचाकी, चारचाकी, जड वाहनांच्या माध्यमातून प्राप्त होणार्या करापोटी ९ कोटी ८३ लाख ३८ हजार ११८ रुपये आणि २ कोटी ७७ लाख २0 हजार ८२८ रुपयांचा महसूल प्राप्त केला.
चार महिन्यांमध्ये आरटीओला ११ कोटी १९ लाखांचा महसूल
By admin | Updated: August 19, 2014 01:23 IST