शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सदोष वाहनांवर आरटीओची नजर; योग्यता प्रमाणपत्र तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:47 IST

योग्यता प्रमाणपत्र तपासणीत आढळलेली अनियमितता आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्यभरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. आरटीओतर्फे ८ ते २३ आॅक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात योग्यता प्रमाणपत्र तपासणी केली जाईल.

अमरावती : योग्यता प्रमाणपत्र तपासणीत आढळलेली अनियमितता आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्यभरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. आरटीओतर्फे ८ ते २३ आॅक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात योग्यता प्रमाणपत्र तपासणी केली जाईल. याबाबत गृहविभागाने परिवहन विभागाला निर्देश दिले आहेत. या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नसलेली व प्रमाणपत्र असूनही रस्त्यावर चालण्यास धोकादायक वाहनांची तपासणी होईल.प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांची तपासणी करून ठराविक कालावधीसाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. पण, ही तपासणी काटेकोरपणे न केल्याचे आढळून आल्याने ३७ वाहन निरीक्षकांना निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर यासंदर्भातील एका जनहित याचिकेमध्ये योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर परिवहन विभागामार्फत सध्या करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत ७ सप्टेंबरच्या रोजीच्या आदेशात असमाधान व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्णय घेतला आहे.

तरच वाहनांचे नूतनीकरणमोहिमेदरम्यान वाहनास योग्यता प्रमाणपत्र असूनही ते सदोष आढळल्यास वाहनाचे प्रमाणपत्र निलंबित केले जाईल. योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने जवळच्या दुरुस्ती केंद्रांमध्ये अडकवून ठेवली जातील. ही वाहने रस्त्यावर चालण्यासाठी योग्य करून संबंधित वाहनमालकाला अधिकाºयांसमोर सादर करावे लागतील. त्यानंतर तपासणी करून वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण होईल.

कार्यालयप्रमुखावर शिस्तभंगक्षेत्रीय कार्यालयामधील वायुवेग पथकांनी परिवहन संवर्गातील वाहनांच्या तपासणीत योग्यता प्रमाणपत्र नसणे अथवा असूनही वाहन रस्त्यावर चालण्यास धोकादायक असेल, तर संबंधितांवर कार्यवाहीचे आदेश आहेत. या सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित आरटीओच्या कार्यालयप्रमुखांविरुद्ध शिस्तभंग कारवाई केली जाणार आहे.

८ ते २३ आॅक्टोबरदरम्यान वाहनांची तपासणी मोहीम राबविली जाईल. तत्संबंधीचे आदेश कार्यालयांना प्राप्त झालेत.- विजय काठोळेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.

टॅग्स :Amravatiअमरावती