आॅनलाईन लोकमतअमरावती: आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मागील १० फेब्रुवारीपासून आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. २७ फेब्रुवारीपर्यंत ५ हजार २९६ अर्ज प्राप्त झाले, तर अर्ज करण्याची २८ फेब्रुवारी ही अखेर मुदत आहे. बुधवारी ही मुदत संपणार आहे. दरम्यान, प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झाले नाही.आरटीई प्रवेश प्रक्रियेत आॅनलाइन अर्ज करण्यास जिल्हाभरात पालकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. राज्यात नागपूर, पुणे व त्यानंतर सर्वाधिक प्रवेश अर्ज अमरावती जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील विविध केंद्रांमधून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून, अर्ज दाखल करण्याचा बुधवार २८ फेब्रुवारी हा अखेरचा दिवस आहे.जिल्हाभरातील २३३ शाळांमध्ये नर्सरीच्या २१० तर इयत्ता पहिली ते आठवीच्या मिळून जवळपास २८६६ जागा आहेत. दरम्यान, आरटीई प्रवेशाच्या नोंदणीच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी आल्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया काही ठिकाणी खोळंबली होती. त्यामुळे या प्रक्रियेला वरिष्ठ स्तरावर मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आरटीई प्रवेश अर्जाची मुदत आज संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:29 IST
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मागील १० फेब्रुवारीपासून आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. २७ फेब्रुवारीपर्यंत ५ हजार २९६ अर्ज प्राप्त झाले, तर अर्ज करण्याची २८ फेब्रुवारी ही अखेर मुदत आहे.
आरटीई प्रवेश अर्जाची मुदत आज संपणार
ठळक मुद्देअखेरची संधी : प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा कायम