शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक घोषित

By admin | Updated: March 6, 2017 00:08 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले आहेत.

जिल्ह्यातून ५ हजार ३० अर्ज : ७ मार्च रोजी पहिला 'ड्रॉ'अमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले आहेत. त्यानुसार जिल्हाभरातून सुमारे ५ हजार ३० प्रवेश अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. तसेच शिक्षण विभागांतर्गत आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी ७ मार्च रोजी पहिली सोडत काढण्यात येणार आहे.शालेय शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. शिक्षण विभागाच्या संकेस्थळावर २ मार्चपर्यत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठीची मुदत होती. त्यानुसार पालकांनी आरटीईच्या जागांसाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार नर्सरी, के.जी. १, के.जी.२, प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यात २१४ शाळा पात्र ठरल्या आहेत. आरटीईच्या सर्व प्रवेशासाठी सुमारे ५५०० जागा उपलब्ध आहेत. यासाठी जिल्हाभरातून ५ हजार ३० अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता पालकांचे लक्ष विद्यार्थ्याचे प्रवेशाकङे लागले आहे. शिक्षण विभागाने आरटीईच्या वेळापत्रकही जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार मंगळवार ७ मार्च रोजी पहिला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवेशासाठी साधारपणे ८ मार्चपासून आरटीईनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथी लॉटरी काढण्यात येणार आहे. यादरम्यान किती विद्यार्थ्याना प्रवेश मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र२५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी रहिवासी वास्तव्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज, टेलिफोन बिल, घरपट्टी, पाणीपट्टी बिल, दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा, वाहन चालविण्याचा परवाना, वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग, अपंगत्व प्रमाणपत्र, एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला आर्थिक वर्ष २०१५-१६ चा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आदी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.भातकुली पं.स. सभागृहात सोडतआरटीनुसार आॅनलाईन प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडे प्राप्त ५ हजार ३० अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची सोडत ७ मार्च रोजी भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता काढण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी सांगितले.शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा प्रवेशासाठी जिल्ह्यात २१४ शाळा पात्र ठरल्या आहेत. ५ हजार ३० अर्ज आमच्याकडे आले आहेत. लवकरच वेळापत्रकानुसार लॉटरी पध्दतीने राबविली जाईल- एस. एम. पानझाडे,शिक्षणाधिकारी प्राथमिक