शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

६५९ कोटींची गरज मिळाले ५७ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:37 IST

जिल्ह्यात एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रामधील कपाशी पीक बोंडअळीमुळे उद्वस्त झाले. यासाठी शासनाने ३० हजार ८०० रूपये प्रतीहेक्टर मदत जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना किमान ६५९ कोटी कोटी २३ लाखांच्या मदतीची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचे नुकसान : कृषिमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रामधील कपाशी पीक बोंडअळीमुळे उद्वस्त झाले. यासाठी शासनाने ३० हजार ८०० रूपये प्रतीहेक्टर मदत जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना किमान ६५९ कोटी कोटी २३ लाखांच्या मदतीची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ ‘एसडीआरएफ’चे ४८ व पीक विम्याचे ९.११ कोटी असे एकूण ५७ कोटी उपलब्ध केले असल्याने पीक विमा कंपन्या व बियाणे कंपन्यांच्या मदतीचे काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.यंदा बीटी तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानेच शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले. हजारो हेक्टरमधील कपाशीच्या उभ्या पिकात शेतकºयांनी नांगर फिरविला. शेतकरी आक्रमक झाल्यानेच शासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे आदेश २३ डिसेंबरला दिलेत. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बोंड अळीने बाधित क्षेत्राला दोन हेक्टर मर्यादेत जिरायती कपाशीला हेक्टरी ३० हजार ८००, तर बागायती कपाशीला ३७ हजार ५०० रूपये हेक्टरप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. कपाशीच्या पंचनाम्याअंती जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रातील कपाशी बाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकाºयांनी ‘एमडीआरएच्या निकषाप्रमाणे १८२ कोटी ६० लाखांच्या मदतीची मागणी शासनाकडे केली. प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यातील ४८ कोटी व पीकविम्याचे ९.११ कोटी शेतकºयांना उपलब्ध केल्याने उर्वरित ६०२ कोटींचा मदतनिधी केव्हा, असा त्यांचा सवाल आहे. खरीप हंगाम दोन आठवड्यावर आला असून तूर घरी पडून आहे, ज्यांनी विकली त्यांचे चुकारे बाकी असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.बियाणे कंपन्यांकडून हवेत ३१८ कोटीबीटी बियाणे तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानेच यंदा बोंडअळीचे संकट ओढावले. याविषयी हजारो तक्रारी झाल्यात. काही तक्रारी पोलीस ठाण्यातही झाल्यात आहेत. बियाणे कंपन्यांकडून हेक्टरी १६ हजारांची मदत देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित १,९९,१७२ हेक्टरसाठी प्रति हेक्टर १६ हजार रूपयांप्रमाणे ३१८ कोटी ६७ लाखांची मदत आवश्यक असताना या मदतीविषयी शासनाने घोषणेनंतर आतापर्यंत अवाक्षरही काढलेले नाहीत.असे हवेत ६५९ कोटीजिल्ह्यात १,९९,१७२ हेक्टरमधील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यात बाधित १,३०८२९ जिरायतीला ३०,८०० रूपये प्रतिहेक्टरप्रमाणे ४०२ कोटी ५५ लाख व बाधित ६८,३४३ हेक्टरला ३७,५०० रूपये प्रति हेक्टरप्रमाणे २५६ कोटी २८ लाख रूपये अशी मदतनिधीची गरज असून शासनाने ५७ कोटीच दिले आहेत.‘एसडीआरएफ’चे १८२ पैकी ४८ कोटीच मिळणारकेंद्राने एप्रिल २०१५ मध्ये ‘एनडीआरएफ’चे निकषामध्ये बदल केले ते राज्यालाही बंधनकारक आहे. या निकषानुसार कीड व रोगामुळे शेतीपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्यास हेक्टरी ६,८०० रूपयांची मदत दिली जाते. पंचनाम्याअंती जिल्ह्यात १८२ कोटी ६० लाख रूपयांच्या निधीची मागणी केली. शासनाने ती मान्यही केली. मात्र, ही मदत तीन समान टप्प्यात देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र पहिल्या टप्प्याचे ६१ कोटी देय असताना ४८.७० कोटीच उपलब्ध केले आहे.विमा भरपाईसाठी १८ कोटी आवश्यक, ९ कोटी प्राप्तबोंडअळीच्या बाधित क्षेत्राला पीकविम्याची हेक्टरी ८ हजारांची भरपाई, असे शासनाने जाहीर केले. यंदा २२ हजार ८४५ हेक्टर कपाशीचा विमा काढण्यात आला. त्यानुसार १८.२७ कोटींची भरपाई आवश्यक आहे. मात्र, विमा कंपन्यांद्वारा जिल्ह्यात १०,९९४ शेतकऱ्यांना ९.११ कोटींची भरपाई देण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ७९ महसूल मंडळापैकी ४७ मंडळांमध्ये भरपाई देण्यात आली, उर्वरित ३२ मंडळांना डावलण्यात आले आहे.