लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रिपाइंने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला लोकसभा नव्हे, तर अनेक निवडणुकांमध्ये सहकार्य केले आहे. प्रत्येक वेळी शब्द पाळण्याचे आश्वासन दिले जाते; मात्र त्याचे पालन केले जात नाही. आघाडीत मित्रपक्षांना योग्य तो सन्मान दिला जात नाही. आम्ही राज्यात १० जागांची मागणी केली आहे. अचलपूर मतदारसंघात मी स्वत: लढणार आहे, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.रिपाइंने धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस आघाडीशी मैत्री केली. यावेळी आम्ही जिल्ह्यातून दर्यापूर व अचलपूर मतदार संघाची मागणी केलेली आहे. मात्र, आघाडीने आम्हाला मुंबईमधील काही जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. या जागा पराभूत होणाºया असल्याने आम्हाला हा प्रस्ताव अमान्य आहे. आघाडीने आता घटक पक्षांचा अंत पाहू नये, असा इशारा गवई यांनी दिला आहे.काँग्रेसचे नेते आम्हाला विधान परिषद व राज्यसभेचे आश्वासन देत आहेत. यापैकी आम्हाला काहीच नको. आघाडीने दर्यापूर या राखीव मतदारसंघातून लढविण्याची मला आॅफर दिली आहे. परंतु, या मतदारसंघात रिपाइंचे पदाधिकारी मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांचा हक्क मी हिरावणार नाही. आपल्याकरिता अचलपूर मतदारसंघ आघाडीने सोडावा, अशी मागणी आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद नसल्याने अचलपूर मतदारसंघातून स्वत:च रिंगणात उडी घेईल. जिल्ह्यातील या दोन ठिकाणी काँग्रेसने पाठिंबा न दिल्यास रिपाइं राज्यात किमान ५० जागी उमेदवार उभे करेल, असे राजेंद्र गवई यांनी सांगितले.
पराभूत होणाऱ्या जागा अमान्य - रिपाइंला हव्यात १० जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST
रिपाइंने धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस आघाडीशी मैत्री केली. यावेळी आम्ही जिल्ह्यातून दर्यापूर व अचलपूर मतदार संघाची मागणी केलेली आहे. मात्र, आघाडीने आम्हाला मुंबईमधील काही जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. या जागा पराभूत होणाºया असल्याने आम्हाला हा प्रस्ताव अमान्य आहे. आघाडीने आता घटक पक्षांचा अंत पाहू नये, असा इशारा गवई यांनी दिला आहे.
पराभूत होणाऱ्या जागा अमान्य - रिपाइंला हव्यात १० जागा
ठळक मुद्देराजेंद्र गवई : अचलपूरमधून स्वत: लढणार, पत्रपरिषदेत माहिती