शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वरूडकरांना सहा दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 01:30 IST

एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा के ला जात आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे.

वरूड : एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा के ला जात आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे.शहरापासून २६ किमी अंतरावरील जमालपूर येथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. दरदिवशी ४० लाख लिटर पाणी आवश्यक आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे ते नियोजन कोलमडले. शहरात दोन जलकुंभ असून, त्यांची संचयक्षमता १३ लाख लिटर आहे. नळजोडणी असलेल्या ग्राहकाला पाच ते सहा दिवसानंतर पाणी मिळते. गावाबाहेरील नवीन वसाहतीत पाइप लाइन नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६५ हजार २२२ असली तरी २०१९ मध्ये ती एक लाखाच्या घरात आहे. शहरात ९५०० वैयक्तिक नळ व ९२ स्टँडपोस्ट आहेत. त्या स्टँडपोस्टवर महिलांमध्ये होणारी शाब्दिक चकमक नित्याचीच झाली आहे. जमालपूर पंपहाऊसवरून होणारा पुरवठा लोणी, पिंपळखुटा मार्गे येतो. मार्गातील काही शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह लीक करून पाणी चोरल्याने शहरातील पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली. परिणामी दोन दिवसांनी येणारे नळ हे पाचव्या ते सहाव्या दिवशी येऊ लागले.शहराबाहेरील वसाहतीमध्ये अद्यापही नळयोजना पोहोचली नसल्याने आणि या परिसरातील विहिरी आटल्याने तेथे नगर परिषदेने तीन टँकर सुरू केले.२०० लिटर पाण्यासाठी ५० रुपये२०० लिटर पाण्याकरिता ५० रुपये मोजावे लागत आहेत. पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. लग्नसमारंभात ३० रुपये प्रतिकॅन पाणी विकत घेतले जात आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडल्याने १५ रुपयांचे बाटलीबंद पाणी २० ते २५ रुपयांमध्ये विकले जात आहे.नागरिकांनी सहकार्य करावेशहरातील विहिरी आटल्याने आणि जमालपूर येथे मुबलक पाणीसाठा नसल्याने काटकसरीने वापर करावा. नळाला तोट्या लावा. पंप बसवून पाणी काढू नये. पाण्याचा अपव्यय टाळा. नवीन बांधकाम पावसाळ्यापर्यत बंद ठेवा, असे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी आवाहन केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई