शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेती विकून उभारले वृद्धांसाठी ‘विसाव्या’चे छत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:47 IST

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मागे कुणी नसताना केवळ दुसऱ्यांच्या सुखासाठी झिजणाऱ्या कामिनी अवधूत यांच्या पुढाकाराने विसावा वृद्धाश्रमाची इमारत साकारण्यात आली. सुमारे चार वर्षांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुुक्यातील निंबोरा बोडखा येथील कामिनीबाई अवधूत ढोकणे या विसावा वृद्धाश्रमात राहायला आल्या. त्यांनी लावलेला जिव्हाळा हा कायम स्मरणात राहणारा असल्याचे मत यावेळी वृद्धाश्रमातील त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केले.विसावा ...

ठळक मुद्देविसावा वृद्धाश्रम : कामिनीबाईच्या आठवणींना उजाळा, आश्रितांबद्दल होता जिव्हाळा

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मागे कुणी नसताना केवळ दुसऱ्यांच्या सुखासाठी झिजणाऱ्या कामिनी अवधूत यांच्या पुढाकाराने विसावा वृद्धाश्रमाची इमारत साकारण्यात आली. सुमारे चार वर्षांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुुक्यातील निंबोरा बोडखा येथील कामिनीबाई अवधूत ढोकणे या विसावा वृद्धाश्रमात राहायला आल्या. त्यांनी लावलेला जिव्हाळा हा कायम स्मरणात राहणारा असल्याचे मत यावेळी वृद्धाश्रमातील त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केले.विसावा वृद्धाश्रमामध्ये कामिनीबाई ढोकने यांची प्रथम पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कामिनीबाईच्या आठवणीने विसावा वृद्धाश्रमातील प्रत्येक वृद्ध ओशाळून गेले होते. कामिनीबार्इंनी आपली स्वमालकीची शेती विकून त्यातून आलेल्या पैशातून विसावा वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांच्या निवाऱ्याकरिता इमारत बांधून दिली होती. कामिनीबाईच्या या दानशुरतेने उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला होता.वृद्धाश्रमातील वृद्धांच्या प्रेम व आपुलकीने त्यांचे मन येथे रमले होते. विसावा वृद्धाश्रमातील वृद्धांना राहण्यासाठी सुयोग्य निवारा नसल्याची खंत त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील शेती विकून त्यातून येणाऱ्या पैशातून वृद्धांना राहण्याची सोय व्हावी यासाठी निवाऱ्याचे बांधकाम करून देण्याचा मानस वृद्धाश्रमाचे संचालक भाष्कर कौतिककर, पुंडलिक भुजाडे यांच्याकडे व्यक्त केला. आपल्या निधनानंतर वृद्धाश्रमात आपला अंत्यविधी करावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर कामिनीबार्इंनी आपल्या गावी असलेली शेती विकून वृद्धाश्रमाला भली मोठी इमारत बांधून दिली. त्यांच्या हातूनच या इमारतीचे भूमिपूजनसुद्धा झाले होते. एका वृद्ध म्हातारीचा हा दानशूरपणा पाहून त्यावेळी सर्वजण भारावून गेले होते. त्यानंतर एक वर्षाने १८ डिसेंबर २०१६ रोजी कामिनीबाईचे आजाराने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार विसावा वृद्धाश्रमातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यांची समाधीसुद्धा तेथे बांधण्यात आली.वृद्धाश्रमात त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा संजय ढोकणे हा संपूर्ण परिवारासह वृद्धाश्रमात उपस्थित होता. संजय ढोकणे हा वृद्धाश्रम संचालक भाष्कर कौतिककर यांच्या हस्ते पुण्यतिथीचे सोपस्कार पार पाडण्यात आले. यावेळी अशोक कनेर, विजय खंडेलवाल, जितेंद्र खंडेलवाल, गावंडे गुरूजी, जवंजाळ, गुल्हाने मॅडम, देवानंद गुळदे, अनूप बेदरकर, सचिन वानखडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.