शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोरगड येथील दहा घरांचे छप्पर उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:34 IST

तालुक्यातील मोरगड येथे १६ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता वादळाच्या तडाख्याने जवळपास दहा घरांची छपरे उडाली. यात जीवित हानी झाली नाही. परंतु सहा दिवस उलटूनही तालुका प्रशासनातर्फे आर्थिक मोबदल्यासाठी कुठल्याच प्रकारचा पंचनामा करण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे आदिवासींमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवादळाचा तडाखा : सहा दिवस लोटूनही प्रशासन झोपेतच; कुटुंबे उघड्यावर

चिखलदरा : तालुक्यातील मोरगड येथे १६ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता वादळाच्या तडाख्याने जवळपास दहा घरांची छपरे उडाली. यात जीवित हानी झाली नाही. परंतु सहा दिवस उलटूनही तालुका प्रशासनातर्फे आर्थिक मोबदल्यासाठी कुठल्याच प्रकारचा पंचनामा करण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे आदिवासींमधून संताप व्यक्त होत आहे.मोरगड येथे सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने दहा घरांवरील छपरे पत्त्यासारखी उडून गेली. काही कळायच्या आतच घरातूनच थेट आभाळ दिसू लागले. आदिवासी अक्षरश: घाबरून घराबाहेर पडत सुटले. या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरांची पडझड झाली. या नुकसानाची माहिती १७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता सरपंच व पोलीस पाटील यांनी परिसराचे पंचायत समिती सदस्य बन्सी जामकर यांना दिली. यासंदर्भात त्यांनी चिखलदराचे तहसीलदार मनीष गायकवाड यांना माहिती दिली, मात्र निवडणुकीत सर्व व्यस्त असल्यामुळे आपण तलाठी व संबंधितांना गावात पाठवित असल्याचे त्यांनी सांगितले. १७ एप्रिल रोजी जामकर यांनी भेट दिली. परंतु अद्यापही प्रशासनाकडून कुणीही पोहोचले नसल्याची माहिती जामकर यांनी दिली.चक्रीवादळाच्या तडाख्यात दिलीप बुडा जांबेकर, अजाब बुडा जांभेकर, अरुण जांबेकर, भास्कर सदाशिव सोनोने, राजा सोनाजी बेलसरे , सुनील बुडा जांभेकर, राजाराम धांडेकर, मनोहर झारू जांबेकर, मुला तूरु कास्देकर यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले.सहा दिवस लोटून सुद्धा मोरगड येथील आदिवासी उघड्यावर आहेत. त्यांच्या घरांचे पंचनामे करून त्यांना शासकीय नियमाने तात्काळ मोबदला देण्यात यावा.- बन्सी जामकर, सदस्य, पंचायत समिती चिखलदरापंचनामा करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार मदत करण्याची तजविज करण्यात आली. तहसील प्रशासनाकडून कुठलाही हलगर्जीपणा करण्यात आला नाही.- मनीष गायकवाड,तहसीलदार चिखलदरा