शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘राँग साईड’ दुचाकीस्वाराने चिमुकल्याला उडविले

By admin | Updated: September 1, 2016 00:09 IST

भरधाव ‘राँग साईड’ वाहन चालवून एका सायकलस्वार चिमुकल्याला उडविणाऱ्या दुचाकीस्वारांना संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला.

संतप्त नागरिकांनी दिला चोप : समर्थ हायस्कूलनजीकची घटनाअमरावती : भरधाव ‘राँग साईड’ वाहन चालवून एका सायकलस्वार चिमुकल्याला उडविणाऱ्या दुचाकीस्वारांना संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला. ही घटना समर्थ हायस्कूल चौकात बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. मणीबाई गुजराती शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या रोहीत गुल्हाने हा समर्थ हायस्कूलनजीक सायकल घेऊन उभा होता. दरम्यान विरूद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकीने रोहितच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात रोहित गंभीर जखमी झाला. शाळकरी मुलाचा अपघात झाल्याचे पाहून शेकडो नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. रोहितला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी घेतले ताब्यातअमरावती : मात्र, प्रत्यक्षदर्शींचा रोष उफाळून आला होता. उपस्थित नागरिकांनी अपघात घडवून आणणाऱ्या दुचाकीवरील दोन्ही युवकांना बेदम चोप दिला. दुचाकीवरील दोन्ही युवक मद्यधुंद अवस्थेत विरुद्ध दिशेने वाहन आल्यानेच अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.नागरिकांनी दोन्ही युवकांनी बेदम मारहाण करीत असतानाच तेथे वाहतूक पोलीस पोहोचले. पोलिसांनी नागरिकांचा रोष पाहून दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, नागरिकांचा रोष शांत होत नव्हता. पोलिसांच्या ताब्यातील दोन्ही युवकांना मारहाण करणे सुरुच होते. त्यामुळे नागरिकांसमोर पोलिसही हतबल झाले होते. थोड्याच वेळात जखमी रोहितचे काही नातेवाईक सुद्धा घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही दोन्ही युवकांना बदडणे सुरु केले. नागरिक व नातेवाईकांच्या मारहाणीमुळे दोन्ही युवक रक्तबंबाळ झाले होते. तणावाची स्थिती निर्माण होत असताना सीआरओ मोबाईल पोलीस व्हॅन घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा नोंदविला गेला नव्हता.