शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मॉडिफाईड सायलेन्सरवर फिरणार रोलर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

पान १ प्रदीप भाकरे अमरावती : बुलेट किंवा तत्सम वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून धडधड आवाज करीत जाणाऱ्या बुलेटवीरांवर वाहतूक ...

पान १

प्रदीप भाकरे

अमरावती : बुलेट किंवा तत्सम वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून धडधड आवाज करीत जाणाऱ्या बुलेटवीरांवर वाहतूक शाखेने दंडाचा बडगा उगारला आहे. ध्वनिप्रदूषणात भर घालणाऱ्या त्या मॉडिफाईड बुलेट सायलेन्सरवर रोडरोलरदेखील फिरविला जाणार आहे.

रस्त्याने जोराचा आवाज करीत भरधाव जाणाऱ्या बुलेट सध्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत. दुरूनच या वाहनांचा आवाज यायला लागतो आणि ती जवळ आली की, रस्त्यावरील अन्य दुचाकीचालक विशेषतः वृद्ध आणि शालेय विद्यार्थी घाबरून, भांबावून जातात. त्यातूनच छोटे-मोठे अपघात होत असतात. शहरात कॅम्प, पंचवटी, शिवाजीनगर, व्हीएमव्ही रोड, कठोरा रोड या मार्गांवर अशा दुचाकीस्वारांचा धुमाकूळ असतो. अशांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील १५ दिवसांत २७ वाहनांचे मॉडीफाईड सायलेंसर काढून घेऊन त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मॉडिफाईड सायलेंसर काढून त्याऐवजी दुसरे आवाज न करणारे सायलेंसर लावून घेतल्यानंतरच ती वाहने सोडण्यात येत आहेत.

////////////

सायलेंसरवर पाच हजारांचा खर्च

दुचाकीतून विशिष्ट आवाज येण्यासाठी सायलेंसरमध्ये काही बदल घडवून आणण्यात येतात. त्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च केले जातात. दरम्यानच्या काळात पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे या चालकांना धाक बसल्याचे दिसत आहे. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात २७ वाहनांचे मॉडिफाईड सायलेंसर काढण्यात आले. मोटार वाहन कायद्यातील १९० (२) या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली. या नियमानुसार १००० रुपये दंड होऊ शकतो. जबर दंड बसल्याशिवाय अशा दुचाकीचालकांना कायद्याचा धाक बसणार नाही.

////////////

३३ लाखांची बाईक चालविणारा ‘टार्गेट’

एका तरुणाने तब्बल ३३ लाख रुपयांची दुचाकी घेऊन शहरात धूम माजविली आहे. शहरातील तीनही उड्डाणपूल, पंचवटी ते इर्विन चौक, चपराशीपुरा ते रेल्वे स्टेशन चौकातून तो शहरभर प्रचंड आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसवून फिरत असतो. त्याच्या बेदरकार वेगाबाबत शहर वाहतूक शाखेकडे तक्रारदेखील आली आहे. त्यामुळे तो ‘बुलेटराजा’ पोलिसांच्या रडारवर आला आहे.

////////////

कोट

शहरात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांसंदर्भात वाहतूक शाखेकडे तक्रारी आल्या. सबब, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व मॉडिफाईड सायलेंसरवर कारवाई करण्यात येत आहे. ज्यांनी आपल्या बुलेटला मॉडिफाईड सायलेंसर लावून घेतले, त्यांनी ते स्वत:हून काढून टाकावेत.

- बाबाराव अवचार, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा