शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पीक पैसेवारी समितीत सरपंचांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: September 19, 2016 00:23 IST

पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहुतांश सोयाबीन पीक करपले.

वस्तुनिष्ठ अहवालासाठी आवश्यक : समितीत आठ सदस्यअमरावती : पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहुतांश सोयाबीन पीक करपले. अशा अवस्थेत पैसेवारी काढण्यासाठी स्थानिक पातळीवरून वस्तुनिष्ठ अहवाल तहसीलदारांना सादर होणे आवश्यक आहे. यासाठी आठ सदस्यीय ग्राम पैसेवारी समितीत समावेश करण्यासाठी सरपंचांनी तहसीलदारांना पत्र देणे महत्त्वाचे आहे. बहुतांश शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना पैसेवारी काढण्याची पद्धत माहिती नसते, तर कधी पैसेवारी काढण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष केले जाते. याचाच फायदा घेऊन महसूल यंत्रणा शासनाला सोईची असणारी पैसेवारी काढतात. शासनाकडे खोटे अहवाल पाठवितात व शेतकऱ्यांची फसवणूक करतात. यासाठी पीक पैसेवारी समितीत प्रत्येक ग्राम पंचायतीचे ३ अभ्यासू शेतकरी पाठवून समितीत शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण करणे महत्वाचे आहे. जमीन महसूल कायदा १९६६ मधील तरतुदीनुसार महसूल विभागाचे ४ मार्च १९८९ च्या निर्णयानुसार दरवर्षी खरीप व रबी पिकांची पैसेवारी ग्राम पंचायत स्तरावर काढण्यात येते. त्याकरिता ग्राम पैसेवारी समितीची स्थापना दरवर्षी करण्यात येते. यामध्ये तीन शासीय व पाच शेतकरी प्रतिनिधी असतात. सरपंच व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. एक प्रगतिशील शेतकरी व दोन अल्पभूधारक शेतकरी यापैकी शक्यतोवर एक महिला सदस्य असावी व त्याची निवड प्रत्येक ग्राम पंचायतीने दरवर्षी करून त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी तहसीलदारांना द्यावयाची असतात. जर ग्राम पंचायतीने शेतकरी प्रतिनिधिची नावे न पाठविल्यास उर्वरित दोन सदस्य पैसेवारी निश्चित करतील व त्यावर हरकत घेता येणार आहे. विदर्भ व मराठवाड्या हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येते. तत्पूर्वी महसूल कर्मचाऱ्यांद्वारा २५ सप्टेंबर दरम्यान पैसेवारी समितीच्या बैठकी घेतात. यासाठी ग्रा.पं.नी तीन सदस्यांची निवड करून पैसेवारी काढण्यापूर्वी तहसीलदारांना देणे महत्त्वाचे ठरते. अशी आहे ग्राम पैसेवारी समिती जिल्हाधिकाऱ्यांद्वारा दरवर्षी ग्राम पैसेवारी समिती गठित करण्यात येते. राजस्व निरीक्षक या समितीचे अध्यक्ष असतात. ग्रामसेवक, सरपंच, प्रगतिशील शेतकरी, सेवा सोसायटीचे अध्यक्ष, दोन अल्पभूधारक शेतकरी, तलाठी, कृषी सहायक हे या समितीचे सदस्य असतात. यापैकी प्रगतिशील शेतकरी व दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांची निवड संबंधित ग्रामपंचायतींनी करावी. ही निवड वेळेवर न झाल्यास उरलेल्या सदस्यांची समिती अस्तित्वात राहील व ती कामकाज पाहील, असे शासन निर्णयात नमूद आहे. गावपातळीवर वस्तुनिष्ठ पैसेवारी निश्चित व्हावी. यासाठी सरपंच व शेतकरी प्रतिनिधिंनी दक्ष राहणे गरजेचे आहे. यासाठी त्वरित शेतकरी प्रतिनिधींची निवड करून तहसीलदारांना यादी देणे महत्त्वाचे आहे. - भाई रजनीकांत, संयोजक, शेतकरी बचाओ आंदोलन