शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

भय्यू महाराजांची भूमिका कोपर्डीपुरतीच मर्यादित

By admin | Updated: September 21, 2016 00:08 IST

समाजातील काही घटकांनी भय्यू महाराजांवर आरोप करणे सुरू केले असून त्यांची भूमिका कोपर्डीपुरतीच मर्यादित असल्याचा दावा सूर्योदय परिवाराने केला आहे.

सूर्योदय परिवार : मानवतेच्या भूमिकेतून अत्याचाराच्या मुद्याला हातअमरावती : समाजातील काही घटकांनी भय्यू महाराजांवर आरोप करणे सुरू केले असून त्यांची भूमिका कोपर्डीपुरतीच मर्यादित असल्याचा दावा सूर्योदय परिवाराने केला आहे. राज्यात ठिकठिकाणी निघत असलेल्या मराठा मोर्चाशी महाराजांचा संबंध जोडला जात असल्याने ते प्रचंड उद्विग्न झाल्याचे हेमंत देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले.यासंदर्भात भय्यू महाराजांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्याच सूचनेनुसार आपण त्यांच्यावरील आरोपांचा स्पष्ट इन्कार करीत असल्याची भूमिका देशमुख यांनी मांडली. भय्यू महाराजांनी केलेले निवेदनही माध्यमांना देण्यात आले.मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत, ते त्यांनी सरकारशी बोलून सोडवावेत, त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र, कोपर्डीतील त्या अभाग्या मुलीला न्याय मिळावा व दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी भय्यू महाराजांची भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानवतेच्या भूमिकेतून हाती घेतलेल्या कोपर्डीच्या प्रश्नाला कुणाच्याही स्वार्थापायी विभत्स वळण लागावे, हा त्या मुलीच्या मातेचा व त्या अभागी कन्येच्या वेदनेचा अपमान असल्याचे महाराजांना वाटते. कोपर्डीतील ती घटना समजताच महाराज तातडीने तेथे गेले, त्या दु:खी कुटूंबाला आध्यात्मिक बळ देण्याबरोबरच शाळेत जाण्यास घाबरणाऱ्या तेथील मुलींसाठी चार बसेस दिल्यात. मात्र, त्यांच्यावर प्रसिद्धी, पैसा व श्रेय लाटण्यासोबतच भांडवलदारीचे खोटे आरोप करण्यात आलेत. ते आरोप सिद्ध करावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचे आव्हान महाराजांनी दिल्याचे यावेळी पत्रपरिषदेत सांगण्यात आले.आमचा अजेंडा कोपर्डीचआमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि कोपर्डीच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या आहेत. तो प्रश्न मराठा समाजाने वेगळा सोडवावा,अशी स्पष्ट भूमिका भय्यू महाराजांनी घेतल्याचे हेमंत देशमुख यांच्यासह डॉ.राजेश शेरेकर, राजू सुंदरकर, जयसिंग देशमुख, ऋषिकेश वैद्य, रवि देशमुख यांनी यावेळी सांगितले.