शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या रोह्याची २३ तासानंतर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 12:11 IST

तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर शिवारातील कोरड्या खचलेल्या विहिरीत एक वयस्क रोही पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली होती. रोह्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चालविलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना २३ तासांनंतर यश आले.

ठळक मुद्देरेस्क्यू ऑपरेशन वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर शिवारातील कोरड्या खचलेल्या विहिरीत एक वयस्क रोही पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली होती. रोह्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चालविलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना २३ तासांनंतर यश आले. मंगळवारी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून रोह्याला जीवदान दिले. यावेळी त्याला बेशुद्ध करण्यात आले होते.दिलीप नारिंगे (रा. शिरजगाव फत्तेपूर) यांच्या शेतातील २० फूट खोल कोरड्या विहिरीत एक रोही पडल्याचे एका शेतकऱ्याला दिसले. याची माहिती तिवसा वनविभागाला देण्यात आली होती. रोह्याला बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्रीच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. मात्र, विहीर अडगळीच्या ठिकाणी असल्याने प्रयत्न थांबविले. मंगळवारी सकाळी तिवसा येथील वनविभागाने पुन्हा प्रयत्न केले. मात्र, त्यांना शक्य न झाल्याने अमरावती येथील वनविभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. विशेष रेस्क्यू आॅपरेशन दरम्यान रोह्याला ट्रँक्यूलायझरने बेशुद्ध करण्यात आले आणि क्रेनच्या मदतीने दुपारी ३.४५ वाजता विहिरीतून रोह्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.असे पार पडले ऑपरेशनबेशुद्ध केलेल्या रोहीला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली होती. यावेळी क्रेनच्या मदतीने वनविभागाचे जवान विहिरीत उतरले होते. यावेळी त्यांनी जिवाची बाजू लावली.यांनी केली कामगिरी१५ जणांच्या चमूने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले. तिवसा वनरक्षक गोविंद येवले, गजानन लादे, मनोहर वणवे, पशुवैद्यकीय अधिकारी अतुल खेरडे, रेस्क्यू टीमचे अमोल गावनेर, चंद्रप्रकाश मानकर, रवींद्र उज्जैनकर, सतीश उमप, वैभव राऊत, मनोज ठाकूर, फिरोज खान आदींनी परिश्रम घेतले. विहीरीतून बाहेर काढताच रोह्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.रोहीला इजा पोहोचू नये ही खबरदारी घेण्यात आली. विहीर खोल व अडगळीच्या ठिकाणी होती. त्यामुळे मोठ्या परिश्रमानंतर रोह्याला बाहेर काढण्यात आले.गजानन लादे, वनरक्षक, तिवसा

टॅग्स :forest departmentवनविभाग