शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणात हरविले रस्ते

By admin | Updated: January 11, 2016 00:09 IST

गावाच्या विकासासाठी नगरपालिका योग्य निर्णय घेत नसल्यास याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

चांदूरबाजारमधील स्थिती : पालिकेची मालमत्ता अतिक्रमणातसुमित हरकुट चांदूरबाजारगावाच्या विकासासाठी नगरपालिका योग्य निर्णय घेत नसल्यास याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. याचा प्रत्यय स्थानिक नगरपालिका हद्दीची बाजारपेठ पाहिल्यावर लक्षात येते. येथील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असताना अतिक्रमण काढण्यास नगरपालिकेच्यावतीने कोणतीही ठोस कार्यवाही करीत नाही. चांदूरबाजार हे गाव परतवाडा-मोर्शी तसेच अमरावती व मध्य प्रदेश सीमेच्या मधोमध आहे. येथील बाजारपेठ मोठी आहे. या गावाला जवळपास ६० ते ७० खेडे लागून असल्याने येथे नेहमीच ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी रेलचेल असते. मात्र येथील अतिक्रमण रहदारीस अडचण निर्माण करीत आहे. अतिक्रमणाची ही समस्या अनेक वर्षांपासून असूनही ते काढण्यास पालिका प्रशासनातर्फे कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात येत नाही. स्थानिक नगरपालिका मुख्याधिकारी तसेच जनप्रतिनिधी अतिक्रमण काढण्याबाबत मौन असल्याने सामान्य जनतेला बाजारपेठात पायदळ चालणेसुध्दा दुरापास्त झाले आहे. विशेष म्हणजे गावातील अतिक्रमण न काढण्याचा व अतिक्रमण करणाऱ्यांना सहयोग करण्याचा विडाच काही पालिका सदस्यांनी उचललेला आहे. आपले मताचे राजकारण तसेच अर्थकारणामुळे काही नगरसेवकांनी शहराला कुरुपतेची चादर पांघरुण शहरातील नागरिकांना वेठीस धरले आहे. शहराच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एवढे अतिक्रमण वाढले आहे की, अनेकांनी अर्ध्या रस्त्यावर दुकाने थाटली आहे. रस्ते अरुंद झाले आहेत. तसेच शहरात दिवसेंदिवस लोकांची रहदारी वाढलीच आहे. तालुक्यातील ही सर्वात मोठी बाजारपेठ असून गावाचा विकास अतिक्रमणामुळे खुंटत चालला आहे. याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने लोकप्रतिनिधीविरुद्ध असंतोष खदखदत आहे. त्यामुळे या अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न जिल्हाधिकारी, अमरावती यांनीच सोडवावा, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे.