लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीतील रस्ते नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. अचलपूर तहसीलच्या मागून खिडकी गेट चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.परतवाडा शहरातील आठवडी बाजारापासून जयस्तंभ ते दुराणी, दुराणी ते गुजरी बाजार, दुराणी ते टीव्ही टॉवर चौपाटी, टीव्ही टॉवर ते टिळक चौक रस्त्यांसह शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. अगदी नगर परिषदेसमोर एकता ज्वेलर्सलगतही रस्त्यावरील खड्डे अपघातांना व आजारांना आमंत्रण देत आहेत.दोन्ही शहरांतील रस्त्यांवरील खड्डे शहराच्या प्रतिष्ठेला मारक ठरत आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाजे असून, पायी चालणेही कठीण होत आहे. भाजी बाजाराकडे जाणाºया रस्त्यावरील खड्डे आणि त्यातील पाणी प्रशासनाची उदासीनता दर्शवित आहे. या भाजीबाजारात सर्वत्र पावसाचे पाणी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नगर परिषदेने ओटे दिले असताना येथे रस्त्यावर भाजी विकली जाते, तेथेच लिलावही केला जातो.भाजीबाजारात जाण्याकरिता असलेल्या अनेक रस्त्यांपैकी अंतर्गत काही रस्ते अतिक्रमणकर्त्यांनी बंद पाडले आहेत. ट्रक, आॅटोरिक्षासह चारचाकी वाहनांंची ये-जा भाजीबाजारातील अंतर्गत रस्त्याने होत असल्यामुळे भाजीबाजार, फळ बाजाराकडे येणाºया नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील घाण, कचरा, दुर्गंधी, डुकरांसह मोकाट जनावरांचा मुक्त संचार रोगराईला आमंत्रण देत आहे.
अचलपूर-परतवाड्यातील रस्ते उठलेत नागरिकांच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 19:24 IST
परतवाडा शहरातील आठवडी बाजारापासून जयस्तंभ ते दुराणी, दुराणी ते गुजरी बाजार, दुराणी ते टीव्ही टॉवर चौपाटी, टीव्ही टॉवर ते टिळक चौक रस्त्यांसह शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले आहेत.
अचलपूर-परतवाड्यातील रस्ते उठलेत नागरिकांच्या जिवावर
ठळक मुद्देखड्डेच जास्त : भाजी बाजारात सर्वत्र घाण, पशूंचा संचार