शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासह संरक्षण भिंतीच्या कामात अपहार

By admin | Updated: November 5, 2015 00:27 IST

तालुक्यात येणाऱ्या चुनखडी, खडीमल व माडीझडप गावाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्ता व सुरक्षाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार करण्यात आल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

७५ लाखांमधून सुरू होते बांधकाम : खडीमल चुनखडीच्या कामाची तक्रारलोकमत विशेषनरेंद्र जावरे  चिखलदरातालुक्यात येणाऱ्या चुनखडी, खडीमल व माडीझडप गावाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्ता व सुरक्षाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार करण्यात आल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. लाखांमधून सुरू असलेल्या हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ते वेळेपूर्वीच जीर्ण झाल्याचे उघडकीस आले आहे. चुनखडी फाटा ते खडीमल व तेथून माडीझडप गावापर्यंत एफडीआर निधीअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता व संरक्षण भिंतीचे काम मार्च ते एप्रिल- २०१५ या कालावधीत करण्यात आले. जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत प्रमोद मालवीय नामक कंत्राटदाराने हे काम केल्याची तक्रार भारतीय युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव राहुल येवले यांनी जि.प. कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. उपरोक्त या कामाची अंदाजे किंमत सिमेंट रस्ता ४० लक्ष तर सुरक्षा भिंत ३५ लक्ष रुपये अशी जवळपास ७५ लक्ष रुपये आहे. इतका निधी यावर खर्च करण्यात आला. मात्र, हे काम वेळेपूर्वीच जीर्ण झाल्याने या कामात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे जि.प.बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. पुन्हा काम करण्याची सवयही गावे व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने येथे डांबरीकरणाचा रस्ता तयार करता येत नाही. याचा फायदा घेत कंत्राटदार मोठ्या प्रमाणात निकृष्ट कामे करतात. त्यानंतर पुन्हा दुरुस्तीची बनावट देयके टाकून लाखोंचा भ्रष्टाचार संबंधित अभियंत्याच्या संगनमताने करित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.नियम धाब्यावर७५ लक्ष रुपयांचे काम अतीदुर्गम चुनखडी, खडीमल व माडीझडप या आदिवासी गावांच्या विकासासाठी महत्वपूर्ण असताना या कामात सर्व शासकीय नियम धाब्यावर बसविण्यात आलेत. इतकेच नव्हे तर सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करताना सिमेंटचा वापर कमी करण्यात आला. त्यामुळे रस्त्याचा दर्जा घसरल्याचे दिसून येत आहे. पीआरसीकडे तक्रार करणारजिल्हा दौऱ्यावर येत असलेल्या पंचायत राज समितीपुढे संबंधित कामाची तक्रार करणार असल्याचे काँग्रसेचे महासचिव राहुल येवले यांनी सांगितले. कार्यकारी अभियंत्यांना या संदर्भात तक्रार करण्यात आली असून त्यांनी अद्याप याबाबत कुठलीच चौकशी केली नसल्याचा आरोप राहुल येवले यांनी केला आहे. संबंधित निकृष्ट कामाची चौकशी करुन कंत्राटदार व अभियंत्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी पीआरसीकडेसुध्दा याबाबत तक्रार दाखल करण्यात येईल.- राहुल येवले तक्रारकर्ता, चुरणी ता. चिखलदराहे काम योग्य असल्यानेच त्याचे देयक देण्यात आले आहे. यात कुठल्याच प्रकारचा अपहार झालेला नाही. कामाचा दर्जा उत्तम आहे.- पी.जी. भागवतकार्यकारी अभियंताजि.प. बांधकाम विभाग, अमरावती