शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खड्डयात, पैसा पाण्यात !

By admin | Updated: August 5, 2016 00:17 IST

शहरातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठिंकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.

नगरपंचायतीचे दुर्लक्ष : नागरिकांचे प्रचंड हाल मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वर शहरातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठिंकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. मागील दोन महिन्यांपासून नागरिकांना जणू अडथळ्यांची शर्यतच पार करावी लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र नगर पंचायत प्रशासन दृष्टिहीन झाल्याने या रस्त्यांसाठी आतापर्यंत खर्च केलेला पैसा पाण्यात गेल्याची चर्चा आहे. शहरातील कॉलनी परिसरातील व गावातील अंतर्गत रस्ते चिखलमय झाले आहेत. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शाळेच्या वेळेत या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारांबळ उडत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करणे गरजेचे होते. परंतु नगर पंचायतीच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना मरणयातना सहन करावी लागत आहे. या रस्त्यांवरील गड्ड्यात मुरूम टाकला गेला असता किंवा ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी गिट्टी टाकून डागडूजी केली असती तर नागरिकांचा त्रास टळला असता. खड्ड्यांमुळे अनेकांना कंबरेचे आजार जडले आहेत. दुचाकीस्वारांना खड्ड्यांमुळे किरकोळ दुखापती झाल्या आहेत. नालीवर टाकलेले रपटे फुटल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. प्रत्येक वॉर्डांत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव धोक्यात घालून नागरिकांना वाहन चालवावे लागत आहे. परंतु नगर पंचायत प्रशासन व सत्ताधारी झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र आहे. कॉलनी परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. सव्वालाखे कॉम्प्लेक्स ते छतेरिया ले-आऊट, देशमुख इंजिनियरिंग वर्कशॉप ते जैन ले-आऊटपर्यंत या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने व अंतर्गत रस्त्यांवर चिखल झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. ६ महिन्यांपासून नागरिकांना नाहक त्रात होत असताना नगर पंचायत सत्ताधाऱ्यांमध्ये आस्था नसणे ही शोकांतिका आहे. यामुळे या शहराची खड्ड्यांचे शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये?