शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

18.23 कोटी निधीतून रस्त्यांचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

ना. ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर ३ कोटी ९ लक्ष रूपये निधीतून शिवणगाव ते शिरजगाव मोझरी रस्ता, २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा (प्रजिमा १०३) रस्ता, १ कोटी ७७ लक्ष रुपये निधीतून शिरखेड येथे रा. मा. -३०० काटपूर ममदापूर ते शिरखेड रस्ता, २ कोटी ३८ लक्ष रुपये निधीतून कठोरा येथे रा. मा. -२९८ ए कठोरा टाकळी (पिंपरी गोपालपूर) ते व्हीआर रस्ता आदी कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी भक्कम निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, अनेक कामांना चालना मिळाली आहे. ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी केले.ना. ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर ३ कोटी ९ लक्ष रूपये निधीतून शिवणगाव ते शिरजगाव मोझरी रस्ता, २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा (प्रजिमा १०३) रस्ता, १ कोटी ७७ लक्ष रुपये निधीतून शिरखेड येथे रा. मा. -३०० काटपूर ममदापूर ते शिरखेड रस्ता, २ कोटी ३८ लक्ष रुपये निधीतून कठोरा येथे रा. मा. -२९८ ए कठोरा टाकळी (पिंपरी गोपालपूर) ते व्हीआर रस्ता आदी कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या पाठपुराव्याने ग्रामसडक योजनेत सुकळी येथे ४ कोटी ४७ लक्ष रूपये निधीतून प्र. रा. मा. -१४ (चांगापूर) ते कामुंजा रा. मा. ३०९ (सुकळी ते वनारसी) रस्ता,  गौरखेडा येथे ३ कोटी ६२ लक्ष रूपये निधीतून प्र. जि. मा. -२४ (निंभोरा) गौरखेडा ते बोरखेडा व्हीआर ८२ रस्त्याचे बांधकामाचा ही समावेश करण्यात आला आहे.पालकमंत्री  ठाकूर म्हणाल्या की, पीआय इंडेक्स नुसार ज्या ज्या रस्त्यांसाठी निधीची गरज होती, त्याचा पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेण्यात आली. जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ते विकासाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण होऊन दळणवळणासाठी उत्कृष्ट सुविधा निर्माण होईल व विकासाला गती मिळेल. व्यापक जनहित जोपासण्यासाठी सर्वदूर अनेकविध कामे राबविण्यात येत आहेत. भक्कम पायाभूत सुविधांद्वारे ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. 

नेर पिंगळाई येथे साठवण बंधारामृद व जलसंधारण योजनेत ४० लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई येथे साठवण बंधारा बांधकामाचे व अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास कार्यक्रमात १० लक्ष रूपये निधीतून शेकूमियाँ दर्ग्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर