शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्यासाठी नांदगांवात चक्काजाम

By admin | Updated: July 22, 2016 00:07 IST

तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा अंतर्गत शहरातील रखडलेल्या मुख्य रस्त्यांसाठी नांदगांववासी आक्रमक झाले.

नागरिक आक्रमक : बाजारपेठ बंद, शासनाविरोधात नारेबाजी नांदगांव खंडेश्वर : तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा अंतर्गत शहरातील रखडलेल्या मुख्य रस्त्यांसाठी नांदगांववासी आक्रमक झाले. गुुरुवारी आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी शासन व लोकप्रतिनिधींविरोधात नारेबाजी करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्याच्या रखडेलेल्या कामकाजामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत शहरातील राजकीय नेत्यांनी आंदोलन समिती स्थापन करुन प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. परंतु प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याने आंदोलन समिती व इतर कार्यकर्त्यांनी गुरुवारी रास्तारोको केले. यामध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. गावातील बाजारपेठ बंद होती. यावेळी आंदोलनकर्त्यांची आक्रमकता लक्षात घेता नांदगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमित वानखडे यांनी व्यापक बंदोबस्त लावला. आंदोलनामध्ये आंदोलन समितीचे प्रकाश मारोटकर, राजेश पाठक, संजय पोपळे, ज्ञानेश्वर शिंदे, शिवाजी मेश्राम, धनराज रावेकर, राजेश जाधव, न्यायमन खाँ, सय्यद अनवर, प्रभाकर शिंदे, अरुण शिंदे, गुणवंत चांदुरकर, मो. साजिद, सागर सोनोने,ब्रह्मानंद शामसुंदर, अभय बनारसे आदी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)