शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

मार्चअखेरीस होणार नगरपंचायतींचा मार्ग सुकर

By admin | Updated: January 3, 2015 22:54 IST

राज्यामधील १३८ तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायत ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायत स्थापनेचा निर्णय यापूर्वीच्या आघाडी सरकारने घेतला होता. यासाठी ७८ नगरपंचायतींकरिता अधिसूचना

अमरावती : राज्यामधील १३८ तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायत ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायत स्थापनेचा निर्णय यापूर्वीच्या आघाडी सरकारने घेतला होता. यासाठी ७८ नगरपंचायतींकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मात्र शासनाने मान्यता न दिल्यामुळे या नगरपंचायतींचा मार्ग रखडला होता. मात्र हिवाळी अधिवेशनदरम्यान काही आमदारांनी नगरपंचायतींचा प्रश्न उचलून धरल्याने मुख्यमंत्र्यांनी मार्च २०१५ पर्यंत शासनमान्यता देऊन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले त्यामुळे नगरपंचायतींचा मार्ग सुकर झाला आहे.जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी तालुका मुख्यालयांचा यामध्ये समावेश आहे. तालुका मुख्यालयी ग्रामपंचायत असणाऱ्या ठिकाणी ‘क’ वर्ग नगरपंचायत स्थापनेचा निर्णय मार्च २०१४ मध्ये यापूर्वीच्या आघाडी सरकारने घेतला होता. या नगरपंचायत विषयी ३० जून २०१४ पर्यंत आक्षेप व हरकती मागविल्या. बहुतांश ठिकाणी ‘क’ वर्ग नगरपंचायत स्थापनेचा निर्णय यापूर्वीच्या आघाडी सरकारने घेतला होता. या नगरपंचायत विषयी ३० जून २०१४ पर्यंत आक्षेप व हरकती मागविल्या. बहपतांश ठिकाणी आक्षेप आलेच नाही. तसेच स्थानिक ग्रामपंचायतींचे मासिक सभा व आमसभांचे अहवाल सकारात्मक आलेत. तसेच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीनेदेखील ‘नाहरकत असलेला’ ठराव नगर विकासकडे पाठविला. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र, उत्पन्न, खर्च, कर्मचारी संख्या यासह सर्व अहवाल नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला. दरम्यान विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता व निवडणुका व नंतर स्थापित नवीन सरकार या घडामोडीत नगरपंचायतींना शासनमान्यता मिळालीच नाही. मागील महिन्यात काही नगरपंचायतींच्या क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्यात नगरपंचायतीचे क्षेत्र हे नागरी क्षेत्र असल्याने या ठिकाणी निवडणूक कशा घेण्यात आल्या अशी विचारणा पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला केल्यानंतर नगरपंचायतींना शासन मान्यता नसल्याची बाब स्पष्ट झाली.नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आ. यशोमती ठाकूर यांनी पुरवणी प्रश्नांच्या सत्रात तिवसा नगर पंचायतविषयी शासनाची भुमिका काय आहे? अशी विचारना केली असता. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार नाही. नगरपंचायत निवडणुकीच होतील, असे आश्वासन सभागृहाला दिले. तसेच आा. अमर मंडलिक व आ. सुधीर मिनचेकर यांनीदेखील याच अनुषंगाने प्रश्न विचारला असताना मुख्यमंत्र्यांनी मार्च २०१५ पर्यंत नगरपंचायतींनी मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायतीच्या मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)