शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीसाठी करार

By admin | Updated: March 2, 2017 00:10 IST

राज्यातील रस्ते निर्मितीची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी १० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे वार्षिक देखभाल करार करण्यात यावा, ...

चंद्रकांत पाटील : सार्वजनिक बांधकाम विभागात आढावा बैठकअमरावती : राज्यातील रस्ते निर्मितीची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी १० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे वार्षिक देखभाल करार करण्यात यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिल्या.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री प्रवीण पोटे, प्रधान सचिव आशिष सिन्हा, सचिव ए. ए.सगने, सी. व्ही. तुमाने, सी. पी. जोशी, तांत्रिक संल्लागार मिलींद आचार्य, प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता सी. व्ही. तुंगे यांच्यासह विभागातील सर्व सहा. मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.ना. पाटील म्हणाले, कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या अधिपत्त्यातील रस्त्यांची निर्मिती गुणवत्तापूर्ण पध्दतीने करण्यासाठी उत्तम काम करणाऱ्या कंत्राटदारांची निवड करावी. परवान्याची अट शिथील करुन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना रस्त्याची कामे द्यावीत. पारदर्शक प्रणाली अवलंबविण्यासाठी तीन लाखांच्या वरील कामांचे ई-टेंडरींग करावे. तीन लाखांच्या खालील ईस्टीमेटला मंजूरी कामांचा दर्जा व डिपीआरची तपासणी करुन द्यावे. डिपीआर तयार करताना नियमातील सर्व मापदंडाच्या अनुषंगाने खऱ्या उतरणाऱ्या कंत्राटरांना रस्ते बांधकामाची कामे द्यावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.रस्त्यावरील खड्डे बुजविण्यापेक्षा त्यावरील पॅचेस उकरुन नव्याने रस्ता तयार करावा. पुढील पाच वर्षाचे रस्ता दुरुस्ती व देखभाल करार विहीत मुदतीत करावा. १० कि.मी. लांबीच्या परिघातील रस्ता दुरुस्ती-निर्मितीचे कामे गुणवत्तापूर्ण करणे व तपासणीची जबाबदारी कार्यकारी अभियंताची राहील, ना. पाटील यांनी स्पष्ट केले.