शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यालगतच्या अतिक्रमणाला अभय

By admin | Updated: March 14, 2016 00:08 IST

पंचवटी, राधानगर ते पुढे गाडगेनगर रस्त्यावर अतिक्रमणाची घेराबंदी असताना अस्ताव्यस्त पार्किंगने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

वाहतूक शाखेचे दुर्लक्ष : गाडगेनगर भागात वाहतुकीचा बोजवारा अमरावती : पंचवटी, राधानगर ते पुढे गाडगेनगर रस्त्यावर अतिक्रमणाची घेराबंदी असताना अस्ताव्यस्त पार्किंगने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. हातगाड्यांच्या अतिक्रमणासह अन्य बेकायदेशीर पार्किंगला वाहतूक शाखेने अभय दिल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. पंचवटी सोडले की, पुढे गाडगेनगर, राठीनगरपर्यंत अतिक्रमणाचा विळखा अधिकाधिक घट्ट होतो. उड्डाण पुलाजवळ तर हातगाड्यांची स्पर्धा लागत असल्याने गाडगेबाबा मंदिर परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या उड्डाण पुलाखाली अवैध पार्किंगसह हातगाड्यांवर तत्सम वस्तू विकणाऱ्यांची भाऊगर्दी वाढली आहे. पदपथावर फ्रूट मार्केटगाडगेनगर भागात पदपथावर फ्रूट तथा भाजी मार्केट बनविण्यात आले आहे. चहाटपरी, चायनीज, गॅरेज, पेपर विक्रेते अशा लघु व्यावसायिकांची मांदियाळी आहे. या अतिक्रमणानेच हा भाग व्यापला आहे. परिणामी रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या अतिक्रमणासह अवैध वाहतुकीवर कारवाई न करता वाहतूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी नेमके काय करतात, हे एक कोडेच आहे. उल्लेखनीय म्हणजे विशिष्ट भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांकडेच दंड वसूल करण्यासाठी चालान बुक देण्यात आल्या आहेत. गाडगेनगर भागाचा त्यात समावेश नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्यासह अन्य अतिक्रमणावर हातोडा फिरविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे वेळ आहेच. अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी डीसीपी नितीन पवार यांन स्वीकारली होती. मात्र, अंमलबजावणी होताना दिसत नाही. रस्त्यावरील अतिक्रमण हटवून या रस्त्याला मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. व्यावसायिक संकुलाकडून पार्किंग गिळंकृतगाडगेबाबा मंदिरालगतच्या पदपथावर व्यावसायिकांनी प्रचंड अतिक्रमण केले आहे. पायी चालणेही दुरापास्त आहे. व्यावसायिक संकुलांना स्वत:ची पार्किंग व्यवस्था नसल्याने सार्वजनिक जागेवर चारचाकींसह दुचाकींच्या रांगा लागतात. वाढते अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत.महापालिकेसह वाहतूक शाखेने अतिक्रमण हटवावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे.