अमरावती : जेवडनगर प्रभाग क्र. ३७ मध्ये बहुतांश परिसर हा संमिश्र लोकवस्तीचा आहे. या प्रभागात सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे नव्याने विकसित असलेल्या वस्तीमधील खडीकरणाचे रस्ते डांबरीकरण करणे हा होय. नाल्यावरील पूल निर्मिती, नाल्यांवर संरक्षण भिंतीचा अभाव आहे. यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. प्रभागातील चार उद्याने विकसित आहेत. मात्र जे अविकसित आहेत, त्यांना चालना देण्याची गरज आहे. सुलभ शौचालयाची संख्या वाढविणे व दुरू स्तीची आवश्यकता आहे. अशा विविध समस्या निकाली काढण्यासाठी भरीव निधीची गरज आहे आणि या भागाचा विकास व्हावा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.सार्वजनिक शौचालयांची प्रचंड दुरवस्था महापालिकेच्या जेवडनगर प्रभागात नागरिकांच्या सोयीसाठी सुलभ शौचालय आहेत. मात्र चवरेनगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाण असलेल्या पाणी टाक्याची दुरवस्था झाली आहे. यासोबत सुलभ शौचालयाची संख्या लोकवस्तीच्या तुलनेत अपुरी पडत असल्याने या भागासह महापालिकेचे प्रभागात असलेले शौचालये दुरूस्ती व नूतनकीरण तसेच वाढीव शौचालयाची निर्मिती जनहिताच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे, याकडे नगरसेवकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.संरक्षण भिंत, पूल निर्मितीची गरज छत्री तलावापासून तर पोटबन कॉलनी तसेच लोकवस्तीमधून जाणाऱ्या सार्वजनिक नाल्याला पूर संरक्षण भिंत नसल्याने या नाल्याला संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे. यासोबतच जेवडनगर पोटबन कॉलनीला जोडणारा सार्वजनिक नाल्यावरील पुलाच्या निर्मितीचा मुद्दा मागील कित्येक वर्षांपासून नागरिक व लोकप्रतिनिधी उपस्थित करीत आहेत. मात्र या यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन जनहिताचा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून हा प्रश्न सोडविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.उद्याने उपलब्ध, पण देखभालीचा अभाव महापालिकेच्या जेवडनगर प्रभागात विविध भागांत उद्याने आहेत. यामध्ये चार उद्यानांना संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत. यासाठी या भागाच्या लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा केला आहे. यामध्ये काही उद्यानांची कामे प्रस्तावित आहेत. मात्र यापैकी बऱ्याच उद्यानात परिसरातील मुलांना व नागरिकांसाठी महापालिकेमार्फत ज्या सुविधा पाहिजेत त्याचा मात्र अभाव असल्याचे दिसून आले. या उद्यानाच्या विकासाकरिता व सुविधेसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असला तरी याला मात्र प्रशाकीय यंत्रणेने मुहूर्त काढला नाही. त्यामुळे या प्रभागातील अविकसित उद्यानाचा कायापालट करण्यासाठी पुढाकार घेण्याची खरी गरज आहे.
डांबरीकरणाअभावी रस्त्यांची दुर्दशा
By admin | Updated: October 10, 2015 00:35 IST