शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘आरओ’ प्लांटधारकांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:41 IST

पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्डा याबाबत शनिवारी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आढावा घेतला. प्रशासनास उपाययोजनांसंदर्भात सूचना देताना त्यांनी आरओ प्लांटधारकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचे निर्देश : व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्डा याबाबत शनिवारी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आढावा घेतला. प्रशासनास उपाययोजनांसंदर्भात सूचना देताना त्यांनी आरओ प्लांटधारकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.शहरातील सर्व शाळा, दवाखाने, उद्याने, मंगल कार्यालये, मॉल, लॉन, महापालिका कार्यालये तसेच इतर सरकारी कार्यालये, खुले भूखंड या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्डा त्वरित करून घ्यावा. यापैकी अनेक ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. वॉटर कॅन (आरओ प्लांट) व्यावसायिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य आहे. ज्या व्यवसायिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले नसेल, त्यांना सोमवारपर्यंतची मुदत असून, त्यानंतर प्रशासकीय कारवाईच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. क्रेडाई संघटनेने रेन वॉटर हार्वेस्टिंगसंबंधी केलेले स्ट्रक्चर तपासण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी सहायक संचालक नगर रचना विभागाच्या अभियंत्यांना दिले. बैठकीला उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त योगेश पिठे, विशाखा मोटघरे, शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, सहायक संचालक नगररचना सुदेश वासनकर, उपअभियंता सुहास चव्हाण, भास्कर तिरपुडे, प्रमोद इंगोले, तौसिफ काझी, मधुकर राऊत, श्यामकांत टोपरे, अभियंता अनंत पोतदार, प्रमोद कुलकर्णी, सुनील चौधरी, सुधीर गोटे, लक्ष्मण पावडे, नितीन भटकर, आरोग्य विभागाचे दिवाण आदी उपस्थित होते.कीटकजन्य रोग प्रतिबंधाविषयी आढावाराष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकुनगुन्या प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर आढावा सभेचे आयोजन महापालिकेत करण्यात आले होते. या बैठकीला मनपा आयुक्त संजय निपाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. तिरोडेकर, सहायक आयुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे व अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विक्रांत राजूरकर यांनी मार्गदर्शन केले. कीटकजन्य आजाराबाबतची सद्यस्थिती व साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना महानगरपालिका स्तरावरून राबविण्यात येणाºया उपाययोजनांबाबत या सभेत आढावा घेण्यात आला.