२९ विवाह रोखण्यात यश। ११ प्रकरणात गुन्हा दाखल
अमरावती : कोरोनाकाळात धूमधडाक्याने होणाऱ्या लग्न सोहळ्यावर निबंध असताना, दुसरीकडे बालविवाह लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मार्च २०२० आतापर्यंत २९ बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीला यश आले आहे. यामध्ये ११ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गतवर्षापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे लग्न सोहळ्यांवर निर्बंध आले आहेत. मोजक्याच मंडळीच्या उपस्थितीत विवाह होत असल्याने अनेक ठिकाणी बालविवाह घडत आहेत. गावपातळीवर अल्पवयीन प्रेमप्रकरण हीसुद्धा बालविवाहाचे नवे कारण ठरत आहे. काही ठिकाणी निरक्षरता आणि आर्थिक विवंचना यातून पालकांनी आपल्या मुलीचे लग्न उरकून टाकले. आर्थिक ओझे कमी होईल, या कारणांनी विवाह सोहळे पार पडली जात आहेत. मागील दीड वर्षात २९ बाल विवाह रोखण्यात बाल संरक्षण विभागाला यश आले आहे, तर ११ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉक्स
एकूण हजेरी - ४७४९
मुले - २१००
मुली - २६४९
बॉक्स
किती शाळा सुरू - १८२
किती अध्याय बंद - ५६६
बॉक्स
पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?
नुकत्याच उघडलेल्या शाळांमध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत पटसंख्येत कमालीची घट झाली आहे. विशेषत: यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक्स
अल्पवयीन मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र
१८ वर्षांखालील मुलींचे व २१ वर्षांखालील मुलांचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. यानंतरही काही पालकांनी आपल्या मुलीचा विवाह पार पडले. यामुळे बहुतांश ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून येते.
बॉक्स
आर्थिक विवंचना हेच कारण
बालविवाह पार पाडण्याच्या मागे विविध कारणे आहेत. परंतु, लॉकडाऊनमध्ये अनेक जण बेरोजगार झाले. त्यामुळे मुलींच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचार करीत लग्न लावून देण्याचे प्रकार समोर आले आहेत.
कोट
लॉकडाऊनच्या काळात २९ बालविवाह थांबविण्यात आम्हाला यश आले असून, बालविवाह होऊच नयेत, याकरिता आम्ही सूूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक महसुली गावात आम्ही आमच्या गावात बालविवाह होऊच देणार नाही. अशा प्रकारचे ठराव ग्राम बाल संरक्षण समितीकडून घेण्याचे काम सुरू आहेत. यामुळे निश्चितच जिल्ह्यात बालविवाहाला आळा बसेल.
- अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अमरावती
कोट
बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. सदर अधिनियमाची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे काम जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून सुरू आहे.
- अतुल भंडागे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अमरावती