पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये सातत्याने होत असणाऱ्या वाढीचा परिणाम वाहतूकदरावर झाला आहे. त्यामुळेच किचनमध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या किराणा, भाजीपाला तसेच इतर वस्तूंची दरवाढ झाली आहे. प्रत्येक घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. घर चालवावे कसे, हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.
एकीकडे कोरोना संसर्गामुळे अनेकांची कामधंदे बंद पडले. नोकरी गेली, त्यात आजाराची भर पडल्याने भयंकर परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. अशातच पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे प्रत्येकासमोर नवीनच संकट उभे ठाकले आहे. गेल्या वर्षभरापासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ होत आहे. झालेली वाढ प्रचंड असल्यामुळे मालाच्या वाहतुकीचा खर्चदेखील पर्यायाने वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून किराणा, भाजीपाला यासह इतरही वस्तूंच्या दरवाढीतून पाहावयास मिळत आहे. भाववाढीचा फटका थोडा फारसा नसून, आवाक्याबाहेरचा आहे. दर महिन्याच्या किराणा खरेदीमध्ये जास्त पैसे मोजावे लागते आहेत तसेच भाजीपाल्याचे दामदुपटीने भाव झाल्याने त्याचादेखील भार सोसावा लागतो आहे. पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचा परिणाम इतरही वस्तूंच्या दरवाढीवर झाला आहे. त्यामुळेच प्रत्येक घरातील किचनमधील खर्चाचे बजेट कोलमडले आहे. अशा कठीण प्रसंगातून प्रत्येकाला जावे लागते आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो, या आशेवर लोक आहेत.
-------------------------
असे वाढले पेट्रोल डिझेलचे दर
फेब्रुवारी २०१७ - ७६.९० रु पेट्रोल/६५.५१ रु डिझेल
मे २०१८ - ८७.२८रु पेट्रोल/७४.८१ रु डीजल
डिसेंबर २०१९ - ८१.९० रु पेट्रोल/७२.४६ रु डिझेल
डिसेंबर २०२० - ८१.९० रु पेट्रोल/८१.८४ रु डिझेल
जानेवारी २०२१ - ९१.६३ रु पेट्रोल/८१.८४ डिझेल
फेब्रुवारी २०२१ - ९४.१३ रु पेट्रोल/८४.६० रु डिझेल
मार्च २०२१ - ९८.७८ रु पेट्रोल/८५.२३ रु डीजल
एप्रिल २०२१ - ९८.१९ रु पेट्रोल/८९.२० रु डीजल
में २०२१ - ९८.०४ रु पेट्रोल/८९.३२ रु डीजल
जून २०२१ - १०२.३३ रु पेट्रोल/९४.३६ रु डीजल
जुलाई २०२१ - १०६.९२रु पेट्रोल/९८.२९ रु डीजल
-----------–-----------
* फुलकोबी ६० रुपये किलो*
१) पत्ताकोबी ४० रुपये किलो
2) गवार ६० रुपये किलो
3) कारले ६० रुपये किलो
4) वांगे ३० रुपये किलो
5) टमाटे ३० रुपये किलो
6) मिरची ८० रुपये किलो
7) कांदा ३० रुपये किलो
--------------------