शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागरिकांच्या जीवावर उठली पालिका

By admin | Updated: June 30, 2016 00:25 IST

जिल्ह्यात सर्वात मोठा परतवाडा येथील आठवडी बाजार समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

सर्वत्र घाणीचे साम्राज्य : परतवाड्याचा आठवडी बाजार वाऱ्यावर, नागरिकांना मोफत मिळताहेत आजारनरेंद्र जावरे परतवाडाजिल्ह्यात सर्वात मोठा परतवाडा येथील आठवडी बाजार समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. नाल्या तुंबल्याने घाण पाणी रत्यावरील खड्ड्यांमध्ये साचले आहे. ठिकठिकाणी तलाव तयार झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी सुध्दा संबंधित नगरसेवक आाणि पालिका प्रशासन आंधळयाचे सोंग घेऊन गप्प असल्याचे संतापजनक चित्र आहे.आठवडी बाजारात दररोज पालेभाज्या, फळांचा लिलाव पहाटे ५ वाजतापासून सुरु होतो. धारणी, चिखलदरा, अंजनगाव, चांदूरबाजार, अकोट, खंडवा, बैतूल, निजामाबाद, आदि परराज्यातून आलेल्या फळांचा लिलाव होतो. ट्रकमध्ये आालेला माला आणि खरेदी करुन चिल्लर विक्रीसाठी नेणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठया प्रमाणात गर्दी असते. तर दुसरीकडे परिसरातील किमान ८० खेड्यातून शेकडो नागरिक पालेभाज्यांसह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. असे असताना नगरपालिका प्रशासन मात्र पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. पालिकेत नवा गडी नवा राजअचलपूर नगरपालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांचे चंद्रपूर येथे स्थानांतरण झाल्यावर त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. तर दुसरीकडे प्रदीप जगताप यांची नवीन मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. जगताप यांनी सोमवारी कामकाजाला सुरुवात केली आहे. जुळया शहरातील कोटयवधी रूपयांची थांबलेली विकासकामे आणि पावसाळयातील घाणीचे साम्राज्य यावर स्वच्छतेचा मंत्र देत कुठल्या पध्दतीने ते आपल्या कार्याला प्रारंभ करतात, यावर नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत. बाजार समिती लक्ष देणार का ?विदर्भात मोठ्या बाजार समिती मध्ये गणल्या जाणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर मोठा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या गप्पा मारणाऱ्या बाजार समितीने एक यार्ड पालेभाजी आणि फळविक्रेत्यांसाठी देवू नये, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा कायदा शासन येत्या आठवड्यात पारित करित असताना त्याच शेतकऱ्यांना घाणीच्या साम्राज्यात आपल माल विकावा लागत आहे. हा कुठला स्वच्छता संदेशपावसाळयाची सुरुवात होताच ग्रामपंचायत, नगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, परिसरात स्वच्छता ठेवावी, ओला कचरा, सुका कचरा, कचरा कुंडी किंवा घंटागाडीत टाकण्यासह उघड्यावरील पदार्थ खाऊ नये, आदी सूचना दिल्या जातात. मात्र, पालिका प्रशासन सर्वसामान्य नागरिकांसाठी कशा पध्दतीने कार्य करते, हे ठिकठिकाणी पडून असलेले कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या आणि घाणीचे साम्राज्य यावरून दिसून येते.