शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीत रंगला उंदीर-नागिणीचा खेळ

By admin | Updated: September 17, 2016 00:28 IST

मेळघाटातील शाळा व अंगणवाडी केंद्राच्या इमारती वेळेपूर्वीच जिर्ण होत असल्याने त्यामध्ये साप, उंदीर, घुशी आदी सरपटणारे प्राणी निघत असल्याचे नित्याचे झाले आहे.

चिमुकल्यांमध्ये दहशत : मेळघाटच्या कालापाणी येथील घटनानरेंद्र जावरे  परतवाडामेळघाटातील शाळा व अंगणवाडी केंद्राच्या इमारती वेळेपूर्वीच जिर्ण होत असल्याने त्यामध्ये साप, उंदीर, घुशी आदी सरपटणारे प्राणी निघत असल्याचे नित्याचे झाले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता चिखलदरा तालुक्याच्या कालापाणी गावातील अंगणवाडी केंद्रात नागिण आणि उंदीराचा खेळ अर्धा तास रंगला.चिखलदरा तालुक्यातील कालापाणी गावात अंगणवाडी केंद्रात नेहमीप्रमाणे मुले उसळ, खिचडीसह बडबड गिते आणि खेळण्यासाठी आली होती. अंगणवाडी सेविका पार्वती भुसूम पोषण आहाराच्या कामात व्यस्त असताना अचानक चिमुकल्या मुलांचा अंगणवाडी केंद्रात हलकल्लोळ माजला. जीवाच्या आतंकाने धावत सुटलेला उंदीर त्याचा पाठलाग करीत असलेली नागिण आणि त्यामागे ओरडत सुटलेली मुले, असा काहीसा हा क्षण होता. विद्यार्थ्यांचा गलबला ऐकून अंगणवाडी सेविका पार्वती भुसूम तेथे पोहचल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी क्षणाचा विलंब न करता त्या नागिणला काठ्यांनी मारुन ठार केले. गावकऱ्यांपुढेच नागिणीने शेवटच्या प्रयत्नात उंदीराला तोंडात पकडण्यात यश मिळविले होते. मात्र दुसऱ्याच क्षणात तोंडात उंदराची पकडलेली शिकार पोटात जाण्यापूर्वीच त्याला जीव गमवावा लागला. आदिवासींमध्ये संतापअंगणवाडी केंद्राची नवीन इमारत दोन वर्षापूर्वीच नवीन बांधण्यात आली. मात्र निकृष्ठ कामामुळे ती वेळेपूर्वीच जिर्ण झाली. यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी दिल्या. मात्र प्रशासनाच्या कमिशनखोर वृत्तीमुळे त्यांचा आवाज दाबण्यात आल्याचे नामदेव धांडे, अनिल बेलसरे, रामलाल धांडे, पुंडलिक सुरले, विलास, विजय बेलसरे, विनोद भुसूम, विकास झाडखंडे, प्रवीण बेलसरे आदी संतप्त आदिवासींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बदनापुरची पुनरावृत्ती गत महिन्यात बदनापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क नागराजाने दर्शन दिले होते. त्यानंतर सुद्धा अंगणवाडी आणि शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत.धान्यामुळे उंदीर-सापांचा सुळसुळाटकालापाणी अंगणवाडी केंद्राचा परिसर स्वच्छ नव्हता तर इमारतीला ठिकठिकाणी छिद्र पडलेली होती. दुसरीकडे अंगणवाडी केंद्रामध्ये चवळी, मटकीसह उसळ, खिचडीचा तांदूळ आदी धान्यसाठा ठेवण्यात येतो त्यासाठी उंदराचा शिरकाव आणि उंदराची शिकार करून सापांचे राज्य अशी अन्नसाखळी मेळघाटातील चिमुकल्यासाठी जिवघेणी ठरली आहे. चिखलदरा आणि धारणी अशा दोन्ही तालुक्यातील आश्रम शाळा आणि वसतीगृहांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात कालापाणीच सारखीच आहे.