आदेश : अतिरिक्त सीईओ घेणार खातेप्रमुखांकडून माहितीअमरावती : पंचायतराज समितीने (पीआरसी) ने जिल्ह्याचा दौरा निश्चित केल्यानंतर उपरोक्त प्रमाणे मुद्याचे अनुपालन केले नसल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साक्षीच्या वेळी समिती प्रमुख तसेच अनुपालनाच्या कार्यवाही बाबत सनियंत्रण करण्यासाठी आता जिल्हा परिषदेत दर सोमवारी अथवा कामकाजाच्या दिवशी अतिरिक्त सीईओच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तसे निर्देश ग्रामविकास विभागाने २४ नोव्हेंबर रोजी प्रशासनाला दिले आहेत.विधिमंडळाच्या पंचायत राज समितीमार्फत लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवालावर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात येते. सद्यस्थितीत पंचायत राज समितीमार्फत सन २००८-०९ व आवश्यकते प्रमाणे त्यापुढील आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवालातील मुद्दे साक्षीसाठी विचारात घेण्यात येत आहेत. लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवालातील मुद्यांचे अनुपालन व त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही संबंधित आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण झाल्यानंतर दिलेल्या प्रारूप अहवालाचे मेमोरीडींग करून प्राप्त होणाऱ्या अंतिम अहवालानुसार करणे आवश्यक आहे. सदर अनुपालनाची कार्यवाही ही अंतिम लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे.पंचायतराज समितीने जे मुद्ये साक्षीसाठी पाठविले त्या मुद्यांबाबत जिल्हास्तरावर अनुपालनाच्या दुष्टीने योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तत्परतेने कार्यवाही केल्यास पंचायतराज समितीच्या भेटीच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या साक्षीच्या प्रसंगी समिती प्रमुख व सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सोपे जाते. त्यामुळे पिआरसी सारख्या महत्वाच्या विधिमंडळ समितीला जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत धोरणात्मक शिफारसी शासनाकडे करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत दर सोमवारी अथवा या दिवशी बैठकीचे आयोजन करणे शक्य नसल्यास लगतच्या कार्यालयीन कामकाजाचे दिवशी यासाठी बैठक घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला लेखी पत्र शासनाने पाठविले आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिनी मंत्रालयात आता दर सोमवारी पीआरसीचा आढावा
By admin | Updated: December 10, 2015 00:33 IST