अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात नव्याने रुजू झालेल्या पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी शहरातील जुगार अड्ड्यांचा आढावा घेतला. अकोला येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावरून बदली होऊन चव्हाण अमरावती पोलीस आयुक्तालयात रुजू झाले आहे.रत्नागिरीचे रहिवासी प्रदीप चव्हाण सन २०१० मध्ये नाशिक येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांनी मालेगाव ग्रामीण भागातील धुरा सांभाळल्यानंतर त्यांची बदली रायगडला झाली होती. तेथून अकोट, अकोला व आता अमरावतीमध्ये पोलीस उपायुक्त पदावर रुजू झाले आहेत. शुक्रवारी चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त पदाची धुरा सांभाळली. दरम्यान पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने त्यांनी शहरातील जुगार अड्ड्याचा आढावा घेतला. नागपुरी गेट, कोतवाली, फे्रजरपुरा व राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील जुने जुगार अड्ड्यावर फेरफटका मारून तपासणी केली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांच्यासह चारही ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नव्या डीसीपींकडून जुगार अड्ड्यांचा आढावा
By admin | Updated: October 15, 2016 00:14 IST