शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून पीक कर्ज वितरणाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

शेतकरी बांधवांची अडवणूक करू नका, संवेदनशीलता बाळगून कामे करण्याचे निर्देश अमरावती : खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज ...

शेतकरी बांधवांची अडवणूक करू नका, संवेदनशीलता बाळगून कामे करण्याचे निर्देश

अमरावती : खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज वितरण गतीने होणे आवश्यक आहे. कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ असावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होता कामा नये. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता बाळगून कामे करावी व कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी खरीप कर्ज वितरणाचा आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँक व्यवस्थापक एल.के. झा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, गतवर्षापासून कोरोना साथीचा कठीण वेळ आला आहे. कृषिक्षेत्र अडचणीत आहे. या काळात खरीप हंगामात बियाणे निविष्ठा व इतर कामांसाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संवेदनशीलता बाळगून प्रत्येक गरजू शेतकऱ्याला कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या शेतकरी बांधवांना संपूर्ण माहिती द्यावी. त्यांना अर्ज मिळण्यासाठी सहकार्य करावे. एकही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. शेतकरी बांधवांना कर्ज मिळण्यासाठी चकरा माराव्या लागतात, अशाही तक्रारी आहेत. तसे घडू नये. कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ असणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी यापूर्वीच प्रशासनाने दिली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागू नये. शेतकरी बांधवांची अनावश्यकरीत्या अडवणूक केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बॉक्स

खरीप हंगामासाठी दीड हजार कोटी कर्जाचे उद्दिष्ट

विविध योजनांचा निधी बँकाच्या माध्यमातून लाभार्थींपर्यंत पोहचवला जातो. त्याचे वितरण वेळेत झाले पाहिजे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे पैसे बँकेत येतात, पण ते शेतकरी बांधवांना वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. असे यापुढे कधीही घडता कामा नये, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा खरीपासाठी दीड हजार कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते पूर्ण व्हावे, यादृष्टीने वेगाने कर्ज वितरण करण्याचे निर्देशही पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.