अमरावती : महापालिका क्षेत्रातील लसीकरणासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीची पहिली सभा शुक्रवारी महापालिकेत आयोजित करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी लसीकरणाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
लसीकरण सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर कॉमार्बिड आजार असलेल्या व्यक्तींना व इतर नागिरकांना टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. याकरिता नागरिकांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना अगोदर टोकन क्रमांक देण्यात येईल व त्यानंतर केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. बैठकीला सर्व्हिलान्स मेडिकल ऑफिसर डॉ. ठोसर, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता ए.टी. देशमुख, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, बालरोगतज्ज्ञ नितीन दातीर, सचिव श्रीकांत तिडके, स्त्री वैद्यकीय अधिकारी जयश्री नांदूरकर, शिक्षणाधिकारी अब्दुल राजीक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक अतुल भडांगे, पल्लवी भुसाटे, सीडीपीओ अतुल भडांगे आदी उपस्थित होते.