शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खून का बदला खून; फ्रेजरपुऱ्यात अल्पवयीनाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

अमरावती : ‘खून का बदला खून’ म्हणत एका १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. फ्रेजरपुरास्थित ...

अमरावती : ‘खून का बदला खून’ म्हणत एका १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. फ्रेजरपुरास्थित सिद्धार्थ क्रीडा मंडळासमोर गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला. प्रत्यक्षदर्शीनुसार, तीन हल्लेखोर त्याचा खून करून पळून गेले. जुन्या वैमनस्यातून ही हत्या घडल्याची पोलिसांनी सांगितले. अनिकेत ज्ञानदीप कोकणे (१७, रा. यशोदानगर क्रमांक १) असे मृताचे नाव आहे. त्याआधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपींचा शोध चालवून दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रानुसार, गुरुवारी दुपारी अनिकेत हा एटीएम सेंटरवर पैसे काढण्यास गेला होता. त्याच्या मागावर असलेल्या तीन आरोपींनी त्याचा पाठलाग केला. तेथून जीव वाचविण्यासाठी अनिकेतने दुचाकी पळविली. मात्र, एका ठिकाणी रस्ता बंद असल्याने त्याने दुचाकी सोडून पळ काढला. फ्रेजरपुरास्थित सिध्दार्थ क्रीडा मंडळासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घराकडे धाव घेताना आरोपींनी त्याला पकडले. अनिकेतला पायऱ्यावर गाठून त्याच्या गळ्यावर, मानेवर चाकूचे वार करण्यात आले. खून केल्यानंतर तीनही आरोपींनी तेथून पळ काढला.

पोलीस घटनास्थळी

फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक नितीन मगर हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. तेथून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले. काहींनी खून होत असताना व्हिडीओ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यांचादेखील पोलीस शोध घेत आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने पोलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. पोलिसांनी मृतदेह इर्विनला हलविला. याबाबत मृताच्या पित्याने फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार नोंदविली. आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

खुनाचा आरोप

डिसेंबर २०२० मध्ये बंटी बारसेची हत्या करण्यात आली होती. त्यात अनिकेत कोकणे आरोपी होता. भावाच्या खुनाचा बदला म्हणून गुरुवारी तिघांनी अनिकेतला संपविल्याची प्राथमिक माहिती फ्रेजरपुरा पोलिसांच्या हाती आली आहे.

कोट