शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचे प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:26 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ व ६० वरून ७० व ६५ वर्षे अनुक्रमे केले आहे.

ठळक मुद्देअमरावती विद्यापीठाचे दिशानिर्देशराज्यपालांकडे तक्रार, संभ्रम दूर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ व ६० वरून ७० व ६५ वर्षे अनुक्रमे केले आहे. असाधारण दिशानिर्देश ५०/२०१९ अन्वये १३ डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले आहे. शासनाची परवानगी न घेता वय वाढविल्याप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली असून, याबाबत संभ्रम दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे संचालक नितीन हिवसे यांनी अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाची तक्रार केली आहे. प्राचार्य अथवा प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय वाढविणे किंवा कमी करणे हे अधिकार शासनाला आहे. मात्र, अमरावती विद्यापीठाने दिशानिर्देशाचा आधार घेत अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ७० आणि प्राध्यापकांचे ६० वरून ६५ वर्ष वाढविली आहे. या दिशानिर्देशामुळे निवृत्ती संबंधी महाविद्यालयीन प्रशासन आणि संस्था चालकांची अडचण झाली आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी शासन की, विद्यापीठ कुणाचे नियम पाळावे, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. राज्यात इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांत शासन नियमानुसार निवृत्तीचे वय ग्राह्य धरण्यात येते. अमरावती विद्यापीठाने निर्गमित केलेल्या अध्यादेशाने अभियांत्रिकी महाविद्यालयांत एकच गोंधळ उडाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांचे निवत्ती वयाबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नसताना अचानक अमरावती विद्यापीठाने निवृत्तीचे वय बदलविल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. हा संभ्रम राज्यपालांनी दूर करावा, अशी मागणी नितीन हिवसे यांनी केली आहे. याप्रकरणी केंद्र व राज्य शासनाकडे तक्रार पाठविली आहे.२३ अभियांत्रिकीमध्ये संभ्रमाची स्थितीअमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत २३ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाने दिशानिर्देश जारी करून प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीत वाढ केल्यामुळे महाविद्यालयीन प्रशासन गोंधळले आहे. नेमके निवृत्तीचे वय कोणते ग्राह्य धरावे, याबाबत स्पष्टता नाही. संस्थाचालकही ठोस निर्णय घेऊ शकत नाही, हे वास्तव आहे. आता याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.विद्यापीठाकडे उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे दिशानिर्देश काढले आहे. शासनाच्या गाइडलाइननुसार कार्यवाही करण्यात आली आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र