शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या प्रलंबित

By admin | Updated: June 14, 2014 23:04 IST

नांदगाव (खंडेश्वर) पंचायत समितीमधील सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीने संबंधीत अधिकारी व कर्मचारी कमालीचे उदासीन आहे. त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ उपोषणाच्या

नांदगाव खंडेश्वर : नांदगाव (खंडेश्वर) पंचायत समितीमधील सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीने संबंधीत अधिकारी व कर्मचारी कमालीचे उदासीन आहे. त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ उपोषणाच्या पावित्र्यात आहे. निवड श्रेणीचे २५ टक्के सुध्दा काम झाले नसून याबाबत संघटनेचे पदाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना भेटावयास गेले असता अडचणी सांगून टाळाटाळ करतात. अनेक शिक्षकांची सेवा पुस्तके दिसत नसल्याची सबब सांगून त्याचा शोध न घेता काम ठप्प आहे. तसेच अमरावती जिल्हा परिषद यांनी निवड श्रेणी करिता सेवानिवृत्त शिक्षकांच्या सुटलेल्या नावाची यादी मागविली. पण येथे अजूनही ती यादीच तयार झालेली नाही. दर महिन्याला पहिल्या मंगळवारी पंचायत समिती स्तरावर पेंशन अदालत होणे अपेक्षित आहे. पण अनेक महिन्यांपासून पेंशन अदालत नाही. यासाठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारी जातात. पण कधीच पूर्ण अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. गटशिक्षणाधिकारी ही सभेला हजर नसतात.पंचायत समिती मधून ४ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे गट विम्याचे प्रस्ताव अजूनपर्यंत मंजुरातीकरिता जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले नाही. दर महिन्याच्या पेंशन धारकाच्या चेककरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पंचायत समिती कार्यालयात ठिया द्यावा लागतो. मे २०१४ च्या पेंशनची डिमांडच केली नसल्याचे सांगण्यात आले. सेवानिवृत्तीच्या अशा अनेक समस्या रेंगाळत असल्याने अखेर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला बसण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत चर्चा करतेवेळी तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष एस.बी. मरपाळ, सरचिटणीस एच.एस. कानेटकर, अमरावती जिल्हा संघाचे अध्यक्ष बी.आर. गुंड तसेच बडगे, गणवीर, कारमोरे, कणसे, वानखडे, पारेकर, ठाकरे, गावंडे, महाजन, मारोटकर, गेडाम, म्हात्रे, सव्वालाखे, चोपकर, धोटे यांच्यासह अनेक सेवानिवृत्त शिक्षकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)