शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त न्यायाधीशांचा चौकशी अहवाल अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:02 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बडतर्फ शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चिदानंद बेहेरा यांच्याविरुद्ध तक्रारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.जे. रोही यांनी चौकशी केली. बेहेरांविरुद्ध एकही आरोप सिद्ध होऊ शकले नाही, असा चौकशी अहवाल त्यांनी दिला. मात्र, बडतर्फीची कारवाई झाल्यामुळे विद्यापीठाला सेवानिवृत्त न्यायाधीशांचा चौकशी अहवाल अमान्य असल्याचा सूर उमटला आहे.

ठळक मुद्देबेहेरा यांचे बडतर्फी प्रकरण : आरोप सिद्ध झाले नाही तरीही कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बडतर्फ शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चिदानंद बेहेरा यांच्याविरुद्ध तक्रारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.जे. रोही यांनी चौकशी केली. बेहेरांविरुद्ध एकही आरोप सिद्ध होऊ शकले नाही, असा चौकशी अहवाल त्यांनी दिला. मात्र, बडतर्फीची कारवाई झाल्यामुळे विद्यापीठाला सेवानिवृत्त न्यायाधीशांचा चौकशी अहवाल अमान्य असल्याचा सूर उमटला आहे.विद्यापीठाने १४ मुद्द्यांवर बेहेरांची चौकशी न्या. रोही यांच्याकडे १० जून रोजी सोपविली. त्यांनी काही तक्रारकर्त्यांसोबत थेट संवाद साधून माहिती जाणून घेतली. बेहेरांवरील एकही आरोप सिद्ध होऊ शकले नाही, असा चौकशी अहवाल विद्यापीठाकडे सोपविला. बेहेरांनी विनापरवानगीने सिमेंट ओटा बांधल्याप्रकरणी ही तक्रार होती. परंतु, सन २०१४ च्या निर्माणाधीन ओट्याची तक्रार २०१६ मध्ये कशी केली, याबाबत बेहेरांनी एससी, एसटी आयोगाकडे दाद मागितली. कठोर कारवाईसाठी विद्यापीठात पूर्वग्रह निश्चित होते, असा आक्षेप त्यांनी नोंदविला. न्या. रोहींचा अहवाल प्रकाशात आल्यानंतर विद्यार्थ्यांची तक्रार व त्यांचे स्वाक्षरी असलेले बयाण तसेच विद्यापीठात नसताना ५ फेब्रुवारी २०१६ रोजी निलंबन आणि २४ एप्रिल २०१८ रोजी बडतर्फीची कारवाई कोणाच्या मर्जीने झाली, हा आता संशोधनाचा विषय ठरू लागला आहे.बेहेरांवर हे होते आरोपसच्चिदानंद बेहेरा यांंच्यावर १४ आरोप झाले. यात विनापरवानगी ओटा बांधणे, विद्यापीठविरोधात विद्यार्थ्यांची पोलिसांत तक्रार, विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, पैशांची मागणी, नियमबाह्य बांधकाम, विद्यार्थीनींकडून स्वच्छतागृह साफ करणे, मुस्लिम विद्यार्थ्यांना शिवीगाळ, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, दिवाळी सत्रानंतर अभ्यासक्रम न घेणे, ब्लेझर, न्यूजपेपर, अ‍ॅन्टिव्हायरससाठी पैशांची मागणी आदी आरोप होते. यातील एकही आरोप चौकशीत सिद्ध होऊ शकले नाही.सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून प्राप्त चौकशी अहवालानुसार बेहेरांवर कुलगुरूंच्या अधिकारात बडतर्फीची कारवाई झाली. जे काही आरोप होते, त्यांची चौकशी नियमानुसार झाली. तब्बल अडीच वर्षे चौकशी चालली.- अजय देशमुख, कुलसचिवमाझ्यावरील १४ पैकी एकही आरोप चौकशी समितीपुढे सिद्ध झाला नाही. बडतर्फीची कारवाई पूर्वग्रहदूषित होती. यासंदर्भात राष्ट्रीय एससी, एसटी आयोगाकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.- सच्चिदानंद बेहेरा, बडतर्फ प्राध्यापक, शा.शि. विभाग