शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसात 75 अभ्यासक्रमांचे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 22:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सहा दिवसांत ७५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहे. रविवारी सुटीच्या ...

ठळक मुद्देविद्यापीठातील अभियांत्रिकी सत्र-८ चे निकाल संपले; १२ नोव्हेंबरपर्यंत निकाल लागण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सहा दिवसांत ७५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी २६ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, १२ नोव्हेंबरपर्यंत एकूणच अभ्यासक्रमांचे निकाल लागतील, अशी तयारी करण्यात आली आहे.२६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा आटोपल्या. ३ नोव्हेंबरपासून विद्यापीठाने निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाविद्यालयातून पाठविण्यात आलेल्या गुणांच्या आधारे विद्यापीठ निकाल जाहीर करीत आहे. त्यानुसार सहा दिवसांत ७५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले. रविवारी अभियांत्रिकीच्या सत्र- ८ चे एकूणच निकाल जाहीर करून गुणपत्रिका महाविद्यालयांत पाठविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.दोन दिवसांत जाहीर झालेले निकालशनिवार व रविवार अशा दोन दिवसांत अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. यात पेट्रोकेमिकल, ऑईल ॲन्ड पेंट, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड पॉवर, आयटी, ई.ई, सीएसई, मेकॅनिकल, ईएक्सटीसी, बायोमेडिकल, सिव्हिल, कम्प्यूटर इंजिनीअरिंग तसेच अभियांत्रिकी शाखेत सत्र-८ मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड पॉवर, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिकन्स अँड टेलिकम्युनिकेशन, बी. व्होक सत्र-२, सत्र-४, एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी सत्र-३ व सत्र-१, एम.ए. भाग-२ पाली व प्राकृत, बीपीए सत्र-४, एमसीएम सत्र-३, एमएचआरडी सत्र-२, पीजीओ कौन्सेलिंग ॲन्ड पीएसवाय थेरेपी सत्र-१ व सत्र-२, एम.ए. पीजीओ कौन्सेलिंग ॲन्ड पीएसवाय थेरेपी सत्र -१व सत्र -२, एम.ए. भाग-२ म्यूझिक, भूगोल, बीपीए सत्र-५, एमएस्सी एचएससी सत्र-४ (एफएसएन, एचडी), एमपीएड सत्र-१, सत्र-२, सत्र-३ व सत्र- ४ (सीजीएस) या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.निकाल जाहीर करताना आयसीआर प्रणालीवर ताण वाढला आहे, काही महाविद्यालयांनी अंतर्गत व सत्र गुण पाठविण्यास विलंब लावला. त्यामुळे निर्धारित वेळेत निकाल जाहीर करता येत नाही.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.