शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ‘दिव्यांगां’चा निधी अन्यत्र वळविण्यावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 16:15 IST

 दिव्यांगांच्या उत्थानासाठी राखीव ठेवलेला ३ टक्के निधी त्यांच्यावर खर्च करावा, कुठल्याही परिस्थितीत तो इतरत्र वळवू नये, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग करण्याची ताकीद ‘सरकार’ने दिली आहे.

ठळक मुद्देअन्यथा शिस्तभंगमहापालिका नगरपालिकांना निर्देश

प्रदीप भाकरे/अमरावतीआॅनलाईन लोकमत दिव्यांगांच्या उत्थानासाठी राखीव ठेवलेला ३ टक्के निधी त्यांच्यावर खर्च करावा, कुठल्याही परिस्थितीत तो इतरत्र वळवू नये, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग करण्याची ताकीद ‘सरकार’ने दिली आहे.महापालिका व नगरपालिकांना त्यांच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या कल्याणासाठी ३ टक्के निधी राखीव ठेवून तो इतर प्रयोजनार्थ न वळविता नागरी भागातील दिव्यांगांसाठीच खर्च करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने १४ नोव्हेंबर रजी परिपत्रक काढून दिव्यांगांच्या कल्याणार्थ ठेवलेला निधी वापराबाबत ‘गाईड लाईन्स’ दिल्या आहेत.राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांनी त्यांचा अर्थसंकल्पातील दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी ३ टक्के निधी राखीव ठेवावा, तो निधी दिव्यांगांसाठीच खर्च करणे अनिवार्य असेल. हा निधी रद्दही करता येणार नाही, अर्थात ज्या वर्षासाठी निधी राखीव ठेवला त्याच वर्षात तो खर्च करणे बंधनकारक असेल.३ टक्के निधी राखीव ठेवणे व तो निधी त्याच कामासाठी खर्च करणे अभिप्रेत असताना बहुतांश महापालिका व नगरपालिकांशी हा निधी आरक्षितच केला नाही तर कुठे अन्य कामासाठी वापरल्याचे निरीक्षण नगरविकासला नोंदविले. या निधीचा अन्य प्रयोजनासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री व नगरविकास राज्यमंत्र्यांनी बैठक घेतली. निर्देशप्रमाणे महापालिका आयुक्तांना दिव्यांगांसाठी राखीव ३ टक्के निधीचा वापराबाबत त्या आर्थिक वर्षाच्या मे आॅगस्ट, नोव्हेंबर व फेब्रुवारीच्या १५ तारखेपर्यंत त्यांच्या महापालिकांमधील आढावा घेणे बंधनकारक आहे. तो अहवाल नगरविकास विभागाला सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांचे विषय हाताळण्यासाठी एका उपायुक्तांवर जबाबदारी सोपवावी व त्याची माहिती शासनास सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.संपूर्ण खर्च अनिवार्यजर एखाद्या अधिकाऱ्याने ३ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यास, खर्च करण्यास कसूर केला, सदर निधी दिव्यांग व्यक्तीच्या प्रयोजनाव्यतिरिक्त अन्य कामासाठी वापरल्यास पूर्णपणे खर्च न केल्यास संबंधित अधिकारी शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र ठरणार आहे.मायक्रो प्लॅनिंगमहापालिका आयुक्त व मुख्याधिकारी दिव्यांगांच्या ३ टक्के निधीबाबत आर्थिक वर्षाच्या प्रारंभी ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे. त्याची संबंधित आर्थिक वर्षात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासने दिले आहेत. याबाबत आढावा मंत्रालयातील सह तथा उपसचिवही आढावा घेतील.

टॅग्स :Governmentसरकार