शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतील खासगी स्पर्धा परीक्षेला लगाम

By admin | Updated: April 5, 2015 00:28 IST

शाळेत कोणतीही खासगी स्पर्धा परीक्षा घेता येणार नाही़ आगामी काळात अशी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास..

शासन निर्णय : शिक्षण संस्थेवर कारवाईमोहन राऊत  अमरावतीशाळेत कोणतीही खासगी स्पर्धा परीक्षा घेता येणार नाही़ आगामी काळात अशी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास थेट मुख्याध्यापक व शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले आहे़जिल्ह्यात मागील पाच वर्षांत जि़प़ व खासगी प्राथमिक शाळांत बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्यात. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतरच अशा परीक्षा घेण्यात आल्या. परंतु या स्पर्धा परीक्षामुळे विद्यर्थ्यांना अधिक मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते तसेच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते़ शिक्षण क्षेत्रात चालणारी ही खासगी संस्थांची दुकानदारी बंद करण्यात यावी, अशा आशयाचे अनेक पत्र राज्याच्या शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातून पाठविण्यात आले. विशेषत: बहुउद्देशीय संस्थेकडून बक्षिसांची प्रलोभन दाखवून विद्यार्थ्यांकडून या परीक्षांसाठी तीनशे ते चारशे रूपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारणी करण्यात येत असल्यामुळे गरीब पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो़ इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेत मागील वर्षात अनेक परीक्षा घेण्यात आल्या. आठवी ते दहावीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षामागे वर्षातून शुल्क म्हणून किमान हजार रूपये भरावे लागले असल्याची कैफियत राज्य शासनाकडे मांडण्यात आली़ विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या बौध्दिक, शारीरिक व मानसिक क्षमतेचा विचार करून इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे आगामी काळात बहुउद्देशीय संस्था तसेच कोणत्याही खासगी संस्थेला शाळेत स्पर्धा परीक्षा घेता येणार नाही, असा आदेश शासनाने दिला आहे़ जिल्हा परिषद व खासगी शाळांत आगामी काळात कोणत्याही संस्थेकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार नाही तसेच या संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही. आगामी काळात काही खासगी संस्थांची परवानगीसंदर्भात पत्र मिळाल्यास शाळांच्या अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा़ - चंद्रकांत धाकुलकर,गटशिक्षणाधिकारी, धामणगाव रेल्वे.