शिक्षक, शिक्षणसेवकांची अडवणूक : मान्यतेच्या प्रतीक्षेत प्रस्ताव धूळ खात अमरावती: शिक्षक,शिक्षण सेवकांचे आर्थिक शोषण, विविध कामांमध्ये अडवणूक करुन त्रास देणे, त्यांच्या बेकायदेशीर ठराव करणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांना आता चाप बसणार आहे. यावर बंधने आणणारा प्रस्ताव शिक्षण विभागाचे मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र तीन महिन्यापासून हा प्रस्ताव मान्यतेसाठी धूळखात पडला आहे. शासनाचे अनुदान पात्र संस्थामध्ये शिक्षक व शिक्षण सेवकांची अनेकदा पिळवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. पदभरतीवेळी उमेदवारांकडून अमाप पैशांची केली जाते. या शिक्षकांच्या वैमनातून दरमहा ठराविक रक्कम संस्था चालक घेतात हे वास्तव आहे. पदोन्नति, पेंशनसाठी पात्र शिक्षकांची अडवणूक केली जाते. त्यामुळे संबंधित शिक्षकांचे नुकसान होते. यासाठी संस्थाचालकांकडून बेकायदेशीर ठराव घेतले जातात. त्यामुळे अशा संस्थाचालकांनी चाप देण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न शुरु केले आहे. शिक्षण सेवकांची अवडवणूक करण्याचे प्रकार घडतात. सध्या काही शाळा अनुदानास पात्र आहेत. या शाळांमधील शिक्षकांची संख्या कमी करण्याचे प्रकार घडत आहेत. असे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या संस्थावर शासनाचा वचक असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संस्थाचालकावर काही बंधने आणणारी नियमावली तयार करुन तसा प्रस्ताव शिक्षण विभागाने मागील तीन वहिन्यापूर्वी राज्य शासनाला सादर केला आहे. पुढील काही दिवसांत या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. अनुदानपात्र शिक्षक व शिक्षणसेवकावर शासनाचे नियंत्रण असले पाहिजे. त्यांना शासनाकडून वेतन, पदोन्नती, पेंशन दिली जाते. त्यामुळे त्यांची जबाबदारी शासनाची आहे. यामध्ये त्यांची अवडणूक करण्याचे प्रकार संस्थाचालकाद्वारे केल्या जातात. शिक्षकांनी येणाऱ्या या अडचणींना प्राधान्य देत अश्या संस्थाचालकावर बंधने आणण्याबाबत प्रस्तावात नमूद असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. (प्रतिनिधी)
शिक्षण संस्थाचालकांना लगाम
By admin | Updated: July 24, 2016 00:08 IST