शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने वीज पुरवठा खंडित झालेल्या ९५ टक्के भागातील वीजपुरवठा पूर्ववत

By उज्वल भालेकर | Updated: April 21, 2024 21:44 IST

दहा दिवसांपासून अनेक गावे होती अंधारात; दुरुस्तीसाठी महावितरणने घेतली कंत्राटदारांची सेवा

अमरावती : वादळी पावसामुळे महावितरणच्या चांदूरबाजार उपविभागाअंतर्गत वीज पुरवठा खंडित झालेल्या घाट लाडकी, माधान आणि तळेगाव फिडरवरील ९५ टक्के भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या प्रयत्नांना यश आले आहे. महावितरणने वीजयंत्रणा दुरुस्तीसाठी चार कंत्राट एजन्सींची सेवा घेतली असल्याने उर्वरित भागाचा वीजपुरवठा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोर्शी संजय वाकडे यांनी दिली आहे.चांदूरबाजार परिसरात ९ एप्रिल रोजी झालेल्या प्रचंड वादळाचा मोठा फटका महावितरणला बसला होता. यात चांदूरबाजार उपकेंद्रातून निघणाऱ्या घाट लाडकी, माधान आणि तळवेल फिडरवर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज खांब पडून आणि वीजवाहिन्या तुटून ३० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने ताबडतोब दखल घेत चार कंत्राटदार एजन्सीच्या मदतीने वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामाला गती दिल्याने दुसऱ्याच दिवशी गावठाण भागाचा शंभर टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले; परंतु शेतीपंपाच्या वीजवाहिन्यांचे पोल टू पोल पेट्रोलिंग केल्यानंतर नुकसानीचे स्वरूप आणि वीजखांब, वीजसाहित्य नेण्याची अडचण बघता शेतशिवारातून गेलेल्या वीजवाहिन्यांचे टप्प्याटप्प्याने दुरुस्ती कार्याला सुरुवात करण्यात आली.सद्य:स्थितीत तळवेल फिडरवरील बोराळा आणि परसोडा या दोन गावांतील अंशत: भाग सोडला, तर उर्वरित या फिडरवरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. माधान फिडरवरील चांदूरबाजार येथील कृषिपंपांचे पाच रोहित्राचे काम सुरू असून उर्वरित संपूर्ण फिडरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. घाट लाडकी फिडरवरील चार गावांचा वीजपुरवठा २१ एप्रिलला सकाळी ११ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला; तर सात गावांचा वीजपुरवठा संध्याकाळी पूर्ववत झाला. त्यामुळे तळवेल, घाटलाडकी आणि माधान फिडरवरील ९५ टक्के भागाचा वीजपुरवठा पूर्ववत झाला असून, उर्वरित ५ टक्के भागांचाही वीजपुरवठा लवकरच पूर्ववत होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय वाकडे यांनी दिली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज