शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी रेस्टॉरेंट संचालक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:01 IST

दीड वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या दुकानदारांनी व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला. मात्र, हॉटेल, रेस्टॉरंटचे निर्बंध तसेच कायम ठेवत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यास सांगितले.  या निर्णयावर हॉटेल रेस्टॉरंट व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली. आम्हालाही रात्री ११ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यापारी आणि दुकानदारांत समाधानाचे वातावरण असले तरी हॉटेल, रेस्टॉरेंट व्यावसायिक मात्र नाराज झाले आहेत. वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शहरातील शेकडो हॉटेल, रेस्टॉरेंटचे संचालक एकवटले होते. यावेळी रेस्टॉरेंट ॲण्ड लाॅजिंग असोसिएशन, जिल्हा परमीट रूम असोसिएशनच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीसमोर धरणे देऊन या अन्यायाकडे शासनाचे लक्ष वेधले. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी पवनित कौर यांना निवेद देऊन हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ सकाळी ११ ते सांयकाळी ११ वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली. याचवेळी आंदोलकांनी आपल्या हॉटेल, रेस्टाॅरंटच्या चाव्या गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचेकडे सुपूर्द केल्या.  कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही दिवसापूर्वी ठराविक जिल्ह्यातील कोविड निर्बंध शिथिल केले. त्यामध्ये दुकाने उघडी ठेवण्याबाबतचे सर्व निर्बंध  ८ रात्री वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे दीड वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या दुकानदारांनी व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला. मात्र, हॉटेल, रेस्टॉरंटचे निर्बंध तसेच कायम ठेवत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यास सांगितले.  या निर्णयावर हॉटेल रेस्टॉरंट व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली. आम्हालाही रात्री ११ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. आंदोलनात नितीन मोहोड, आशिष देशमुख, रवींद्रसिंग सलुजा, सारंग राऊत, नितीन कदम, नितीन देशमुख, गजानन राजगुरे, नितीन गुडधे, प्रवीण अळसपुरे, मदन जयस्वाल, नंदकिशाेर जयस्वाल, गुडू धर्माळे, नीलेश जयस्वाल, विशाल तरडेजा, पडाेळे, हर्षद देशमुख, अजय गुल्हाने आदी सहभागी झाले होते.

आजी-माजी लोप्रतिनिधींचा पाठिंबाजिल्ह्यातील हॉटेल, रेस्टाॅरेंट संचालकांनी व्यवसायासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी साठी शुक्रवारी आपल्या व्यवसाय बंद ठेवून हॉटेल, रेस्टॉरंटच्या चाव्या जिल्हा प्रशासनाकडे एकदिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, युवा स्वाभिमानच्यावतीने खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर यांनी समर्थन दिले. शासनाने वरील व्यावसायिकांना वेळ वाढविण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

दीड वर्षात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसानलॉकडाऊनमुळे दीड वर्षात हॉटेल रेस्टॉरंट. व्यावसायिकांची मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुकानदाराप्रमाणे सरकारने हॉटेल, रेस्टॉरेंट व लॉजिंग व्यावसायिकांचाही विचार करावा. वेळ वाढवून न दिल्यास नाईलाजाने आम्हाला अन्यायाविरुद्ध लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा नितीन मोहोड, रविंद्रसिंग सलुजा, सारंग राऊत, गुड्डू धर्माळे, नितीन कदम व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेल