शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसचिवांची जबाबदारी विस्तार अधिकाऱ्यांवर

By admin | Updated: July 16, 2014 23:50 IST

ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत संप सुरू केल्याने जिल्हाभरातील ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता

पर्यायी व्यवस्था: जिल्हापरिषद प्रशासनाचा निर्णय अमरावती : ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत संप सुरू केल्याने जिल्हाभरातील ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज हाताळण्यासाठी विविध पंचायत समितींमध्ये कार्यरत विस्तार अधिकाऱ्यांकडे तातपूरता प्रभार सोपविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधीकारी अनिल भंडारी यांनी घेतला असून याबाबतचे आदेश बिडीओना दिले आहेत.जिल्ह्यातील चौदा पंचायत समितींच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या सुमारे ८४३ ग्रामपंचायतींच्या ४७३ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत संप सुरू केल्याने जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय कामकाज, गावस्तरावरील ग्रामस्वच्छता, विविध विकास कामे कोलमडली आहेत. ऐन शाळेच्या प्रवेश प्रकियेच्या धामधुमीत आणि शेती पेरणीच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी संपाचे अस्त्र उपसल्यामुळे याचा फटका शालेय विद्यार्थी व नागरिकांना सोसावा लागत आहे. दरम्यान शासन व प्रशासनाने या संदर्भात समन्वयातून मार्ग काढण्यासाठी विविध स्तरावर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयन्न केला. मात्र यामधून काही मार्ग न निघाल्याने ग्रामीण भागात ग्रामपंचायतींची कामे रखडून पडली आहेत. शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राअभावी कामे करण्यास अपयश येत आहेत. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज अतिरिक्त सोपवून नागरिकांची कामे करावीत, असे आदेश सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. विशेष म्हणजे या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.