शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहर सुरक्षेची जबाबदारी आपणा सर्वांचीच!

By admin | Updated: August 27, 2014 23:12 IST

नागरिकांनी सतर्कता बाळगून स्वत:ची जबाबदारी कशी पार पाडावी हा महत्त्वपूर्ण संदेश मिशन जागृती या कार्यक्रमातून पोहचतो आहे. सामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेले हे मार्केटिंग लोकोपयोगी आहे,

पोलिसांचा उपक्रम : 'मिशन जागृती' अभियानाद्वारे शहरभरात जनजागृतीअमरावती : नागरिकांनी सतर्कता बाळगून स्वत:ची जबाबदारी कशी पार पाडावी हा महत्त्वपूर्ण संदेश मिशन जागृती या कार्यक्रमातून पोहचतो आहे. सामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेले हे मार्केटिंग लोकोपयोगी आहे, असे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाकडून सांस्कृतिक भवनात बुधवारी 'मिशन जागृती' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त सुरेश मेकला, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी प्रस्ताविक केले. ते म्हणाले की, सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क होणे ही काळाची गरज आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मिशन जागृती हा उपक्रम महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी शहरातील ३४ महाविद्यालयांना भेटी दिल्यात. विद्यार्थांना वाहतूक नियम, सायबर क्राईम व दहशतवादी हल्ले थांबविण्याच्या उद्देशाने काय उपाययोजना कराव्यात, याचे धडे दिले. जबाबदारी लक्षात घेऊन जर नागरिकांनी स्वत:चे कर्तव्य पार पाडले तर नक्कीच एक चांगले शहर निर्माण होऊ शकते. धावत्या गाडीत मोबाईलवर बोलताना अपघात कसे घडू शकतात, तोतया पोलीस महिलांना कसे लूटतात, चेन स्नॅचिंग कशी होते, एखाद्या ठिकाणी बॉम्ब कसा लपविला जातो, बेवारस वस्तू आढळल्यास कशी सतर्कता बाळगावी याबाबतची प्रात्यक्षिके एलसीडी प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थांना दाखविण्यात आलीत. मिशन जागृती अभियानामध्ये अनेकांनी सहभागी होण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नितीन थोरात व आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी केले. यावेळी उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)