भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात सकाळी १० वाजता शहरातील दुकाने, प्रतिष्ठाने सुरू करावेत, यासाठी पायदळ वारी काढण्यात आली. काही व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी विनवणी केली. तरी देखील दुकाने सुरू करण्यात आले नव्हते. येथील जवाहर रोड मार्गावरील एका दुकानाचे अर्धे शटर उघडून भाजपने आंदोलनाचे फोटोसेशन केले. मोची गल्ली, जवाहर रोड, सराफा बाजार, सक्करसाथ येथे दुकाने उघडण्यासाठी आंदोलन झाले. यावेळी स्थायी समिती सभापती सचिन रासने, लवलिना हर्षे, चंद्रशेखर कुळकर्णी, विवेक कलोती, आशिष अतकरे, राजू गोयनका, सुनंदा खरड, प्रणीत सोनी, स्वाती कुळकर्णी, अजय सारसकर, संजय तिरथकर यासह काही नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान आंदोलनकर्ते नांदगाव पेठ येथील सिटीलँड, बिझिलँडचे व्यावसायिक संकुलाकडे गेले आणि येथे भाजपने ठिय्या दिला.
भाजपच्या आंदोलनाला प्रतिसासाद ‘ना’, दुकानांचे शटर बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST